बॉलिवूडच्या या अभिनेत्याचा पत्नीसोबतचा किसिंग व्हिडिओ होतोय व्हायरल, लेहमध्ये व्हॅकेशन करतोय एन्जॉय
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 19:40 IST2019-10-07T19:39:36+5:302019-10-07T19:40:02+5:30
हा अभिनेता प्रोफेशनल लाईफपेक्षा खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतो.

बॉलिवूडच्या या अभिनेत्याचा पत्नीसोबतचा किसिंग व्हिडिओ होतोय व्हायरल, लेहमध्ये व्हॅकेशन करतोय एन्जॉय
अभिनेता मिलिंद सोमण सध्या प्रोफेशनल लाईफपेक्षा खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतो. सोशल मीडियावर पत्नी अंकिता कंवरसोबतचे त्याची केमिस्ट्री त्याच्या चाहत्यांना पहायला मिळते. मिलिंद सोशल मीडियावर अंकितासोबतचे फोटो व व्हिडिओ शेअर करत असतो. नुकताच तो अंकिता सोबत लेहला फिरण्यासाठी गेला आहे. तिथला त्याने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात तो अंकितासोबत वेळ व्यतित करताना दिसतो आहे.
मिलिंद सोमणने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात मिलिंद व अंकिता एकमेकांना किस करताना दिसत आहे. या व्हिडिओत दोघांचं खूप चांगलं बॉण्डिंग पहायला मिळतं आहे. मिलिंदने हा व्हिडिओ शेअर करत लिहिलं की, रोहतांगमध्ये फन टाईम. मनालीतून लेहकडे जाताना. उंचावर जाऊन उडी मारणं जोपर्यंत फन नाही जोपर्यंत तुमच्यासोबत कोणी व्यक्ती नाही ज्यावर तुम्ही प्रेम करत आहात.
मिलिंद व अंकिता यांचे असे व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. या फोटोंमध्ये हे दोघं एकत्र योगा व एक्सरसाईज करताना दिसतात.
याशिवाय त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ते वॉक करताना दिसत आहे. त्याने लिहिलंय की, तुम्हाला जे वाटतं ते करा. ज्यातून तुम्हाला आनंद मिळतो ते करा. इथे पाणी २ डिग्री सेल्सियस आहे.
मिलिंद सोमण ५३ वर्षांचा असला तरी तो फिटनेससाठी सर्वांसाठी प्रेरणा आहे.
त्याच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर २०१९मध्ये प्रदर्शित झालेल्या फोर मोअर शॉट्स प्लीझ या वेबसीरिजमध्ये झळकला होता.