मिलिंद सोमण आपल्या १८ वर्षीय गर्लफ्रेंडसोबत करत आहे खुल्लमखुल्ला प्यार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 18:51 IST2017-11-08T13:21:38+5:302017-11-08T18:51:38+5:30
मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण सध्या त्याच्या लव्हलाइफमुळे भलताच चर्चेत आहे. त्याचे कारणही तसेच असून, त्याच्यापेक्षा वयाने ३३ वर्ष ...

मिलिंद सोमण आपल्या १८ वर्षीय गर्लफ्रेंडसोबत करत आहे खुल्लमखुल्ला प्यार!
म डेल आणि अभिनेता मिलिंद सोमण सध्या त्याच्या लव्हलाइफमुळे भलताच चर्चेत आहे. त्याचे कारणही तसेच असून, त्याच्यापेक्षा वयाने ३३ वर्ष लहान असलेल्या एका मुलीला तो सध्या डेट करत आहे. याच कारणामुळे तो ट्रोलर्सच्या निशाण्यावरदेखील आहे. परंतु याची कुठलीही पर्वा न करता मिलिंद खुल्लमखुल्ला प्यार करताना दिसत आहे. आपल्या गर्लफ्रेंडसोबतचे फोटो तो बिनधास्तपणे सोशल मीडियावर शेअर करीत आहे. यामुळे त्याच्यावर टीकाही होत आहे. परंतु मिलिंदवर त्याचा कुठलाच परिणाम होताना दिसत नाही.
![]()
![]()
दरम्यान, मिलिंदच्या या छोट्या गर्लफ्रेंडचे नाव अंकिता कोवर असे असून, ती व्यवसायाने एअर होस्टेस आहे. काही दिवसांपूर्वीच मिलिंद अंकितासोबत त्याचा ५२ वा वाढदिवस साजरा केला. बर्थ डे सेलिब्रेशनचे अंकितासोबतचे काही फोटोही त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
![]()
![]()
मिलिंद एक बॉलिवूड अभिनेता असण्याबरोबर मॉडेलही आहे. बºयाचशा मॉडलिंगशी संबंधित शोमध्ये त्याने परीक्षकाची भूमिका निभावली आहे. त्याचबरोबर मिलिंद त्याच्या फिटनेसविषयीदेखील प्रचंड जागरूक असून, त्याने जगभरातील बºयाचशा मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदविला आहे.
![]()
![]()
![]()
जगातील सर्वात अवघड समजल्या जाणाºया ‘आयरन मॅन’ स्पर्धेचा किताबही मिलिंदच्या नावे आहे. दरम्यान, तो त्याच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या अंकिताबरोबरच्या अफेअरमुळे भलताच चर्चेत आहे. सोशल मीडियावर तर त्याचे नियमित फोटो व्हायरल होत असून, त्याच्यावर टीकाही केली जात आहे.