गरजू आणि फ्रंटलाईन वर्करसाठी मिका सिंगने सुरु केली लंगर सेवा,खाद्यपदार्थांची चव चाखत घेतला आढावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 05:33 PM2021-05-21T17:33:52+5:302021-05-21T17:34:24+5:30

अनेक सेलिब्रेटींनी मदतीचा हात पुढे करत मैदानात उतरले आहेत. सोनू सूद, सलमान खान, सारा अली खान, अजय देवगण, अमिताभ बच्चन, जॅकलिन फर्नांडिस, अनिल कपूर यासारखे अनेक सेलिब्रिटी मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.

Mika Singh initiates free 'langar sewa' amid pandemic in Mumbai | गरजू आणि फ्रंटलाईन वर्करसाठी मिका सिंगने सुरु केली लंगर सेवा,खाद्यपदार्थांची चव चाखत घेतला आढावा

गरजू आणि फ्रंटलाईन वर्करसाठी मिका सिंगने सुरु केली लंगर सेवा,खाद्यपदार्थांची चव चाखत घेतला आढावा

googlenewsNext

कोरोनाने सर्वत्रच थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊनही जाहीर करण्यात आले आहे. कोरोना काळात प्रत्येकालाचा आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊनमध्ये अनेकांना दोन वेळच्या जेवणासाठीही तारेवरची कसरत करावी लागत आहेत. अशा कठिण प्रसंगी प्रत्येकजण जमेल तशी प्रत्येकाला मदत करताना दिसत आहे. अनेक सेलिब्रेटींनी मदतीचा हात पुढे करत मैदानात उतरले आहेत. सोनू सूद, सलमान खान, सारा अली खान, अजय देवगण, अमिताभ बच्चन, जॅकलिन फर्नांडिस, अनिल कपूर यासारखे अनेक सेलिब्रिटी मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.

मागील काळात अनेक सेलिब्रिटींनी पुढाकार घेत कोरोनाच्या या युद्धात त्यांच्या परिनं गरजूंना मदत कार्य सतत सुरु ठेवलं आहे. नुकतेच सलमान खाननेही   स्वयंसेवी संस्थेतर्फे मुंबईतील फ्रंटलाईन वर्करसाठी नाश्ताची सोय केली होती. स्वतः तो या खाद्यपदार्थांची चव चाखत सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे की नाही या गोष्टीची शहानिशा करताना दिसला होता. 

सलमान पाठोपाठ मिका सिंगने देखील फ्रंटलाईन वर्करसाठी लंगर सेवा सुरु केली आहे. या संकटाच्या प्रसंगी खुद्द मिका सिंगने फ्रंटलाईन वर्करना दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थाची चव चाखत दिले जाणारे अन्न चांगल्या प्रतीचे असल्याची खात्री करुन घेताना दिसत आहे. इतकेच नाही तर तो स्वतःच्या हाताने गरुजुंना जेवण देत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या परिने तो कोरोना काळात मदतीसाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे.

याआधीही मिकाने मिकाने दिल्लीमध्ये गरजूंसाठी लंगर ठेवत जेवणाची व्यवस्था केली होती. सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे आणि फोटोंमुळे  मिकाचे चाहते कौतुक करत आहेत. मध्यंतरी मिका गरजूंना चक्क पैसे वाटताना दिसला.मिकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मिकाला मध्येच एक अपंग व्यक्ती दिसतो त्याच्या जवळ जात विचारपुस करतो. सगळी परिस्थिती जाणून घेतल्यानंतर किराणा त्याची घरी पोहचवला जाणार असेही मिका सांगताना दिसतोय. अनेकदा मिका अशा प्रकारे मदत करताना दिसतो.
 

Web Title: Mika Singh initiates free 'langar sewa' amid pandemic in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.