Mika Singh : मिका सिंगने सेलिब्रेट केला ‘दुल्हनिया’चा वाढदिवस, पण रोमॅन्टिक पोझ देताच झाला ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 15:18 IST2022-08-28T15:17:54+5:302022-08-28T15:18:33+5:30

Mika Singh : आकांक्षाच्या बर्थ डे पार्टीत मिका सिंग सहभागी झााला. मिकाने आकांक्षासोबत अनेक रोमॅन्टिक पोझही दिल्यात. हे व्हिडीओ व्हायरल झालेत आणि मग काय? मिका ट्रोल झाला.

mika singh celebrates gf akanksha puri birthday netizens troll the couple | Mika Singh : मिका सिंगने सेलिब्रेट केला ‘दुल्हनिया’चा वाढदिवस, पण रोमॅन्टिक पोझ देताच झाला ट्रोल

Mika Singh : मिका सिंगने सेलिब्रेट केला ‘दुल्हनिया’चा वाढदिवस, पण रोमॅन्टिक पोझ देताच झाला ट्रोल

बॉलिवूड सिंगर मिका सिंगची ( Mika Singh) ‘दुल्हनिया’ आकांक्षा पुरी (Akanksha Puri) हिने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला. आकांक्षाच्या बर्थ डे पार्टीत मिका सिंगही सहभागी झााला. होणाऱ्या ‘दुल्हनिया’च्या बर्थ डे पार्टीत मिकाने धम्माल केली. आकांक्षासाठी खास गाणी गायली. सरतेशेवटी मिकाने आकांक्षासोबत अनेक रोमॅन्टिक पोझही दिल्यात. मीडियासमोर दोघंही कोझी होताना दिसले. हे व्हिडीओ व्हायरल झालेत आणि मग काय? मिका ट्रोल झाला. होय, अनेकांनी मिका व आकांक्षा या दोघांना जबरदस्त ट्रोल केलं.

बॉलिवूडचा सिंगर मिका सिंगचं स्वयंवर पार पडलं आणि  मिकानं  अनेक वर्षांपासूनची मैत्रिण आकांक्षा पुर  हिच्या  गळ्यात  ‘वरमाला’ घातली. स्वयंवरात देशभरातील वेगवेगळ्या भागातून अनेक सुंदर सुंदर तरूणी आल्या. पण मिकाला इम्प्रेस केलं ते आकांक्षाने. सर्व मुलींना रिजेक्ट करत मिकाने आकांक्षाला निवडलं. स्वयंवर संपल्यानंतर ब-याच दिवसांनी मिका व आकांक्षा एकत्र दिसले. दोघांना एकत्र पाहून काही जण क्रेझी झालेत. पण अनेकांनी या जोडप्याला ट्रोल केलं.

अनेकांना मिका व आकांक्षा यांची केमिस्ट्री जराही आवडली नाही. माहित नाही का? पण या दोघांना एकत्र पाहून फारच विचित्र वाटतंय, अशी कमेंट एका युजरने केली.  ना केमिस्ट्री आहे, ना काही... हे कसं कपल? अशी प्रतिक्रिया अन्य एका युजरने दिलं. 

‘स्वयंवर- मिका दी वोटी’च्या (Swayamvar- Mika Di Vohti)  फिनालेमध्ये  मिकाने आकांक्षा पुरीची निवड केली होती. अर्थात शोमध्ये लग्न करणं त्याने टाळलं होतं. लग्नाआधी मला आकांक्षाला आणखी जाणून घेणं आवडेल. त्यानंतरच आम्ही लग्न करू, असं मिका म्हणाला होता. आता मिका खरंच आकांक्षासोबत लग्न करतो की त्याचं स्वयंवरही निव्वळ ‘ड्रामा’ ठरतो, ते बघूच.

Web Title: mika singh celebrates gf akanksha puri birthday netizens troll the couple