अनुराग बसूचा 'मेट्रो इन दिनो' लवकरच नेटफ्लिक्सवर, थिएटरनंतर आता ओटीटीही गाजवणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 16:49 IST2025-08-10T16:40:20+5:302025-08-10T16:49:43+5:30
'मेट्रो इन दिनों' या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजविषयीची माहिती समोर आली आहे.

अनुराग बसूचा 'मेट्रो इन दिनो' लवकरच नेटफ्लिक्सवर, थिएटरनंतर आता ओटीटीही गाजवणार
Metro In Dino OTT Release: अनुराग बासू दिग्दर्शित 'लाइफ इन अ मेट्रो' हा सिनेमा २००७ मध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर आता तब्बल १८ वर्षांनंतर ४ जुलै २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला 'मेट्रो इन दिनों' हा चित्रपट आला आहे. या चित्रपटावर प्रेक्षकांकडून भरभरून प्रेमाचा वर्षाव झाला आहे. अनेकजण 'मेट्रो इन दिनों' चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची प्रतीक्षा करत आहेत. अशातच 'मेट्रो इन दिनों'च्या ओटीटी स्ट्रिमिंगविषयी महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.
४७ कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने ३६ दिवसांत ५३.०९ कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून भरपूर प्रशंसा मिळाली. दिग्गज कलाकारांच्या भूमिका असलेला हा चित्रपट आता लवकरच ओटीटीवर येणार आहे. जरी अधिकृत घोषणा झालेली नसली तरी ऑगस्टच्या अखेरीस हा चित्रपट नेटफ्लिक्सवर येणार असल्याची चर्चा आहे.
'इंडिया टाईम्स'च्या वृत्तानुसार, या चित्रपटाच्या डिजिटल हक्कांसाठी नेटफ्लिक्ससोबत करार झाला आहे. थिएटर रिलीजनंतर साधारण आठ आठवड्यांनी चित्रपट ओटीटीवर येतो. त्यामुळे 'मेट्रो इन दिनों' २९ ऑगस्ट २०२५ च्या सुमारास नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या चित्रपटात आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, अली फजल, फातिमा सना शेख, कोंकणा सेन शर्मा, पंकज त्रिपाठी, नीना गुप्ता आणि अनुपम खेर असे दमदार कलाकार एकत्र झळकले आहेत. विशेषत: या सिनेमाचं संगीत सर्वांच्या पसंतीस उतरलं आहे.