#Metoo: गैरवर्तनाच्या आरोपावर अभिजीत भट्टाचार्यची धक्कादायक प्रतिक्रिया! म्हणे, माय फुट!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 16:48 IST2018-10-10T16:44:48+5:302018-10-10T16:48:03+5:30

अलीकडे एका माजी फ्लाईट अटेंडेटने बॉलिवूड गायक अभिजीत भट्टाचार्य यांच्यावर छेडछाडीचा आरोप केला.आता या संपूर्ण प्रकरणावर अभिजीत भट्टाचार्यची प्रतिक्रिया आली आहे. 

#Metoo: singer abhijeet bhattacharyas shameless comment over sexual harassment allegations | #Metoo: गैरवर्तनाच्या आरोपावर अभिजीत भट्टाचार्यची धक्कादायक प्रतिक्रिया! म्हणे, माय फुट!!

#Metoo: गैरवर्तनाच्या आरोपावर अभिजीत भट्टाचार्यची धक्कादायक प्रतिक्रिया! म्हणे, माय फुट!!

‘मी टू’ चळवळीमुळे बॉलिवूडमुळे खळबळ माजली आहे. अलीकडे एका माजी फ्लाईट अटेंडेटने बॉलिवूड गायक अभिजीत भट्टाचार्य यांच्यावर छेडछाडीचा आरोप केला. फेसबुकवर पोस्ट शेअर करत तिने आपबीती सांगितली आणि ‘मी टू’ मोहिमेच्या यादीत आणखी एकाची भर पडली.
१९९८ मध्ये कोलकात्याच्या हॉटेलात डान्स करायला नकार दिला म्हणून अभिजीत भट्टाचार्यने आपल्याला जोरात स्वत:कडे खेचले आणि बळजबरीने किस करण्याचा प्रयत्न केला. तू स्वत:ला समजतेस काय, थांब मी तुला चांगला धडा शिकवतो, असे अभिजीत म्हणाल्याचे संबंधित महिलेने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये सांगितले. आता या संपूर्ण प्रकरणावर अभिजीत भट्टाचार्यची प्रतिक्रिया आली आहे. मुंबई मिररशी बोलताना अभिजीतने या संपूर्ण प्रकरणावर बरीच धक्कादायक प्रतिक्रिया दिली. 



अभिजीतने केवळ या चळवळीविषयीचं नाही तर संपूर्ण महिलांबद्दल आक्षेपार्ह प्रतिक्रिया दिली. माझ्यावर अनेक प्रकारचे आरोप झाले आहेत. मला यामुळे काहीही फरक पडत नाही. मी त्यावेळी जन्मलोही नव्हतो. मी माझे बर्थ सर्टिफिकेट दाखवू शकतो, असे अभिजीत म्हणाला. यावर रिपोर्टरने ही काही गंमत नाही़ आम्हाला तुमची बाजू जाणून घ्यायची आहे, असे अभिजीतला म्हटले. यावर अभिजीत चांगलाच सणकला. ‘तुम्हाला माझ्यावर विश्वासचं नाही तर तुम्ही कुण्या दुसऱ्या व्यक्तिवर विश्वास कसा ठेऊ शकता. मला काहीही पडलेले नाही. मी का उत्तर देऊ. हळूहळू ५ हजारांवर लोक आमच्या मागे येतील. या आरोपासाठी माझे एकचं उत्तर आहे, ते म्हणजे, माय फुट. मला प्रश्न विचारणारे तुम्ही कोण? मी माय फुट म्हटले ना. मला ठाऊकचं नाही, आरोप लावणारी व्यक्ती कोण आहे, मग मी इतका भाव का देऊ,’असे अभिजीत म्हणाला.
यापूर्वीही अभिजीतवर गैरवर्तनाचे आरोप लागले आहेत. यापूर्वी दुर्गापूजेदरम्यान अभिजीतने एका महिलेसोबत गैरवर्तन केले होते. हे प्रकरण चांगलेच गाजले होते.

Web Title: #Metoo: singer abhijeet bhattacharyas shameless comment over sexual harassment allegations