#Metoo : माझेही ‘शोषण’ झाले, सैफ अली खानचा मोठा खुलासा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 10:33 IST2018-10-15T10:33:27+5:302018-10-15T10:33:46+5:30

होय, बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यानेही ‘मीटू’अंतर्गत आपल्या शोषणाची कहाणी सांगितली आहे. 

 #Metoo: saif ali khan says I was harassed 25 years ago and I'm still angry about it | #Metoo : माझेही ‘शोषण’ झाले, सैफ अली खानचा मोठा खुलासा!!

#Metoo : माझेही ‘शोषण’ झाले, सैफ अली खानचा मोठा खुलासा!!

देशात सध्या ‘मीटू’ मोहिमेने सर्वांनाच धडकी भरली आहे़ या मोहिमेअंतर्गत रोज नव-नवे आरोप होत आहेत. आरोपांची यादी दिवसागणिक मोठी होत असताना आता या मोहिमेअंतर्गत केवळ महिलाच नाहीत तर पुरूषही स्वत:विरूद्धच्या शोषणाविरोधात आवाज काढू लागले आहेत. होय, बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यानेही ‘मीटू’अंतर्गत आपल्या शोषणाची कहाणी सांगितली आहे. एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत सैफ अली खान ‘मीटू’वर बोलला. ‘मीटू’ मोहिमेअंतर्गत बोलणाऱ्या पीडित महिलांचे दु:ख मी समजू शकतो. कारण मी स्वत:ही यातून गेलो आहे. काही वर्षांपूर्वी माझ्यासोबतही असेच काही झाले होते. माझेही शोषण झाले. अर्थात ते शारीरिक नव्हते. माझ्या करिअरच्या सुरूवातीच्या काळात मलाही प्रचंड त्रास दिला गेला. आजही माझ्या मनात तो राग आहे. बहुतांश लोक दुसºयाचे दु:ख समजू शकत नाही. दुसºयाचे दु:ख समजणे कठीण आहे. माझ्यासोबत काय झाले, याचा विचार करतो तेव्हा माझे मन संतापाने भरून येते. पण मी सध्या याबाबत फार बोलू इच्छित नाही, असे सैफ अली खान म्हणाला.
तनुश्री दत्ता-नाना पाटेकर वादाने बॉलिवूडमध्ये ‘मीटू’ मोहिमेला तोंड फोडले. या मोहिमेअंतर्गत केंद्रीय मंत्री एम जे अकबरपासून पत्रकार विनोद दुआ, ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथ, साजिद खान, सुभाष घई, लव रंजन, पियुष मिश्रा, विकी कौशलचे वडिल श्याम कौशल आदींवर गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत.

Web Title:  #Metoo: saif ali khan says I was harassed 25 years ago and I'm still angry about it