#MeToo : नंदिता दासचे वडिल जतिन दास यांच्यावरही लैंगिक गैरवर्तनाचे आरोप!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 18:47 IST2018-10-16T18:23:03+5:302018-10-16T18:47:18+5:30

नंदिता दास हिच्या वडिलांवरच गैरवर्तनाचा आरोप झाला आहे. होय, नंदिता दासचे वडील आणि चित्रकार जतिन दास यांच्यावर एका महिलेने लैंगिक गैरतर्वनाचा आरोप केला आहे.

#MeToo: nandita das father jatin das accused of sexual harassment nisha bora | #MeToo : नंदिता दासचे वडिल जतिन दास यांच्यावरही लैंगिक गैरवर्तनाचे आरोप!!

#MeToo : नंदिता दासचे वडिल जतिन दास यांच्यावरही लैंगिक गैरवर्तनाचे आरोप!!

बॉलिवूडमध्ये लैंगिक शोषण व कास्टिंग काऊचविरोधातील ‘मीटू’ मोहिमेअंतर्गत अनेकांचे मुखवटे गळून पडले आहेत. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज महिलांनी ‘मीटू’ मोहिमेला पाठींबा दिला आहे. यात पहिले नाव आहे, दिग्दर्शक नंदिता दास हिचे. पण आता नंदिता दास हिच्या वडिलांवरच गैरवर्तनाचा आरोप झाला आहे. होय, नंदिता दासचे वडील आणि चित्रकार जतिन दास यांच्यावर एका महिलेने लैंगिक गैरतर्वनाचा आरोप केला आहे. निशा बोरा असे आरोप लावणा-या महिलेचे नाव आहे. तिने ट्विटर एक पोस्ट शेअर करून आपबीती सांगितली आहे. 



 

२००४ मध्ये माझ्या सास-यांच्या माध्यमातून एका इव्हेंटमध्ये मी जतिन दास यांना भेटले होते. पहिल्याच भेटीत जतिन यांनी मला सहाय्यक म्हणून काही दिवस एकत्र काम करण्याचीची आॅफर दिली. मी त्यांची चाहती होती. त्यामुळे मी लगेच त्यांची ही आॅफर स्वीकारली. यानंतर दिल्लीतील त्यांच्या घरी आम्ही पहिल्यांदा भेटलो. दुस-यांदा  मी त्यांच्या स्टुडिओमध्ये त्यांना भेटायला गेले असता त्यांनी मला बळजबरीने किस करण्यसा प्रयत्न केला. त्यांनी आधी मद्य घेतले. मलाही आॅफर केले. मी नकार देताच त्यांनी मला बळजबरीने अलिंगण देण्याचा प्रयत्न केला. मी तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी मला पुन्हा पकडले आणि माझे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या दाढीचा स्पर्श मला जाणवला. मी त्यांना जोरात ढकलले असता, अरे थांब, तुला चांगले वाटेल, असे ते मला म्हणाले. या घटनेनंतर मला नंदिताचा फोन आला. जतिन यांनी तिला माझा नंबर दिला होता. मी तुला मला अस्टिस्टंट म्हणून कामावर ठेवू इच्छिते, असे ती मला म्हणाली. तिने माझी खूप प्रशंसा केली. पण तिचे ते शब्द मला आतून बोचत होते, असे या महिलेने म्हटले आहे.

Web Title: #MeToo: nandita das father jatin das accused of sexual harassment nisha bora