विनोद मेहराची मुलगी बोल्डनेसमध्ये देते बॉलिवूडच्याही सौंदर्यवतींना टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 10:00 IST2020-04-28T09:55:22+5:302020-04-28T10:00:16+5:30

रुपेरी पडद्यावर सोनियाचे अखेरचे,दर्शन २०१४ साली आलेल्या 'रागिनी एमएमएस-२' या सिनेमात झाले.

Meet Late Actor Vinod Mehra’s Daughter Soniya, Hot And Gorgeous-SRJ | विनोद मेहराची मुलगी बोल्डनेसमध्ये देते बॉलिवूडच्याही सौंदर्यवतींना टक्कर

विनोद मेहराची मुलगी बोल्डनेसमध्ये देते बॉलिवूडच्याही सौंदर्यवतींना टक्कर

हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने रसिकांची मनात अढळ स्थान मिळवणारा कलाकार म्हणजे अभिनेता विनोद मेहरा. आपल्या छोट्याशा सिनेकारकिर्दीत विनोद मेहरा यांनी विविध सिनेमात दर्जेदार भूमिका साकारल्या. त्यांच्या या भूमिका रसिकांच्या मनात घर करुन गेल्या. मात्र कमी वयातच विनोद मेहरा यांनी जगाचा निरोप घेतला. ३० ऑक्टोबर १९९० रोजी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनावेळी त्यांची सोनिया मेहरा लेक अवघ्या २ वर्षांची होती. 

वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सोनियानंसुद्धा अभिनयाच्या क्षेत्रात एंट्री मारली. रुपेरी पडद्यासह छोट्या पडद्यावरही सोनियाने आपली जादू दाखवली. रुपेरी पडद्यावर सोनियाचे अखेरचे,दर्शन २०१४ साली आलेल्या 'रागिनी एमएमएस-२' या सिनेमात झाले. या सिनेमात तिने तान्या कपूर ही भूमिका साकारली होती. याशिवाय एमटीव्हीवरील विविध शोमध्येसुद्धा ती झळकली आहे. 

एमटीव्ही ग्राइंड, एमटीव्ही न्यूज आणि एमटीव्ही स्टाइल चेक अशा शोमध्ये व्हीजे म्हणून तिने काम केले आहे. सोनियाची स्टाइल आणि अदा कुणालाही घायाळ करतील अशाच म्हणाव्या लागतील. तिचा बोल्ड आणि हॉट अंदाज यावर रसिक फिदा आहेत. 

सोनिया सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते. नेहमी तिच्या नवीन फोटो शेअर होताच सोशल मीडियावरील अशाच हॉट आणि सेक्सी फोटोंची खुमासदार चर्चा रंगते. या प्रत्येक फोटोमध्ये तिचा खास आणि हटके अंदाज पाहायला मिळातो. 
 

Web Title: Meet Late Actor Vinod Mehra’s Daughter Soniya, Hot And Gorgeous-SRJ