सलमान खानची भाची करणार बॉलिवूडमध्ये एंट्री, सनी देओलच्या मुलासह करणार रोमान्स...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 14:58 IST2021-03-24T14:57:32+5:302021-03-24T14:58:29+5:30
Salman Khan's niece Alizeh to feature in her debut film,सलमान खानची बहीण अलविरा खान आणि अभिनेता-निर्माता अतुल अग्निहोत्री यांची अलीजे मुलगी आहे.

सलमान खानची भाची करणार बॉलिवूडमध्ये एंट्री, सनी देओलच्या मुलासह करणार रोमान्स...
सध्या स्टार किड्सचा जमाना आहे असं म्हणणं चुकीचे ठरणार नाही. बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसापासून अनेक स्टार किड्स सिनेमात झळकले आहेत.आता या यादीमध्ये आणखी दोन स्टार किड्सची नावे समोर आली आहेत. दबंग सलमान खानची भाची अलीजे
अग्निहोत्रीसुध्दा बॉलीवूडमध्ये एंट्री करण्यास सज्ज झाली आहे.
सलमान खानची बहीण अलविरा खान आणि अभिनेता-निर्माता अतुल अग्निहोत्री यांची अलीजे मुलगी आहे.
रिपोर्ट्सनुसार, अलीजेचा हा डेब्यू फिल्म सूरज बड़जात्याचा मुलगा अवनीश बड़जात्या दिग्दर्शित करणार आहे. तो एक रोमँटिक कॉमेडी फिल्म बनवणार आहे.
या सिनेमात अलीजेसोबत सनी देओलचा धाकटा मुलगा राजवीर देओल झळकणार आहे. राजवीर याच सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याची बातमी आहे.
विशेष म्हणजे यापूर्वीही अलीजेच्या पदार्पणाच्या बातम्या आल्या होत्या. त्यावेळी जावेद जाफरीचा मुलगा मीझान जाफरीसोबत ती पडद्यावर दिसणार असल्याच्या चर्चा होत्या. अखेर त्या चर्चाच ठरल्या.