'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकली 'ही' अभिनेत्री, आर्मी कुटुंबात झाला जन्म; म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 17:42 IST2026-01-06T17:41:49+5:302026-01-06T17:42:41+5:30
फक्त २६ वर्षांची आहे ही अभिनेत्री

'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकली 'ही' अभिनेत्री, आर्मी कुटुंबात झाला जन्म; म्हणाली...
१९९७ साली आलेला 'बॉर्डर' (Border) सिनेमा आजही अनेकांना भावुक करतो. यातील दृश्य, गाणी डोळ्यात पाणी आणणारी आहेत. सनी देओल, सुनील शेट्टी, अक्षय खन्ना, जॅकी श्रॉफ या अभिनेत्यांनी सिनेमात भूमिका साकारली. आता ३० वर्षांनी 'बॉर्डर २' येणार आहे. सिनेमात सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी मुख्य भूमिकेत आहेत. वरुण धवनच्या अपोझिट अभिनेत्री मेधा राणा दिसणार आहे.
मेधा राणा 'बॉर्डर २' मध्ये वरुण धवनची अभिनेत्री आहे. वरुण तिच्याहून १२ वर्षांनी मोठा आहे. मेधा राणा स्वत: आर्मी कुटुंबातील आहे. तिच्या कुटुंबातील तीन पिढ्यांनी आर्म्ड फोर्सेस मध्ये राहून देशाची सेवा केली आहे. मेधाने इन्स्टाग्रामवर लिहिले, 'मी अशा कुटुंबातून आले आहे जिथे तीन पिढ्यांतील पुरुषांनी साहस आणि अभिमानाने देशाची सेवा केली. आणि महिलांनी तितक्याच प्रेम आणि दृढतेने त्यांना पाठिंबा दिला, त्यांच्या मागे ताकदीने उभे राहिल्या. हा प्रोजेक्ट त्या सर्व कुटुंबासाठी श्रद्धांजली अर्पण करणारा आहे ज्यांनी देशाची सेवा केली आहे आणि अजूनही करत आहेत. मी माझे आजोबा, काका आणि वडिलांना पाहिलं आहे जे आर्मीत होते. पण तसंच मी माझ्या आजी, काकू आणि आईलाही पाहिलं आहे. मी वर्दीतील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या असलेल्या साहसी महिलांनाही सलाम करते."
मेधा राणाचा जन्म २५ डिसेंबर १९९९ रोजी गुडगावमध्ये झाला. तिने चंदीगढच्या कार्मेल कॉन्वेंट स्कूलमध्ये शिक्षण घेतलं. नंतर ती बंगळुरुच्या आर्मी पब्लिक स्कूलमध्ये गेली. यानंतर तिने क्राइस्ट युनिव्हर्सिटीतून बीबीएची पदवी घेतली. मेधाचे वडील सुनील राणा आहेत आणि आई ऋतु राणा आहे. तिला एक बहीणही आहे जिचं नाव प्रियंका राणा आहे.