Master!! विजय थलपतीच्या सिनेमावर प्रेक्षकांच्या उड्या, रिलीजआधी सगळे शो हाऊसफुल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 05:43 PM2021-01-12T17:43:52+5:302021-01-12T17:51:09+5:30

2021 चा पहिला मोठा सिनेमा ...!!

master advance booking thalapathy vijays film received houseful shows ahead of its release | Master!! विजय थलपतीच्या सिनेमावर प्रेक्षकांच्या उड्या, रिलीजआधी सगळे शो हाऊसफुल

Master!! विजय थलपतीच्या सिनेमावर प्रेक्षकांच्या उड्या, रिलीजआधी सगळे शो हाऊसफुल

googlenewsNext
ठळक मुद्दे‘मास्टर’ हा एक अ‍ॅक्शन सिनेमा आहे. यात विजय एका कॉलेज प्रोफेसरच्या भूमिकेत दिसणार आहे.

साऊथ सुपरस्टार थलपती विजय आणि विजय सेतुपती स्टारर ‘मास्टर’ हा सिनेमा उद्या रिलीज होतोय आणि त्यापूर्वीच या सिनेमावर लोकांच्या उड्या पडत आहेत. होय, या सिनेमाने रिलीज आधी रेकॉर्डब्रेक कमाईची तयारी केली आहे. अ‍ॅडव्हान्स बुकींगचे आकडे पाहून मेकर्स सुखावले आहेत. गेल्या रविवारी या सिनेमाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरु झाले आणि त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. प्रत्यक्ष तिकिट घेण्यासाठीही चाहत्यांनी गर्दी केली. गर्दी इतकी की, ती पांगवण्यासाठी पोलिस बोलवावे लागलेत.

 चेन्नईत ‘मास्टर’चे संपूर्ण 530 शो हाऊसफुल झाले आहेत. बेंगळुरूमधीलही 510 पेक्षा अधिक शो हाऊसफुल आहेत. कोरोना काळातही सिनेमाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला मिळालेला हा प्रतिसाद पाहून मेकर्स आनंदात नसतील तर नवल.
प्राप्त माहितीनुसार, ‘मास्टर’ हा सिनेमा देशातील 3800 स्क्रिन्सवर रिलीज केला जाणार आहे. पोंगलच्या मुहूर्तावर रिलीज होणारा हा सिनेमा 2021 चा पहिला मोठा सिनेमा आहे. कोरोनामुळे ठप्प पडलेल्या चित्रपटगृहांना हा सिनेमा नवसंजीवनी देणारा ठरेल, अशी अपेक्षा केली जातेय.

तामिळनाडूत 1000 स्क्रिन्सवर हा सिनेमा रिलीज होतोय. आंध्र आणि तेलंगणात 700 स्क्रिन्सवर, केरळ-कर्नाटकात 300 आणि उत्तर भारतातील 1500 स्क्रिन्सवर ‘मास्टर’ प्रदर्शित होतोय. चित्रपटाबद्दलची क्रेज बघता हिंदी भाषेतही हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
‘मास्टर’ हा एक अ‍ॅक्शन सिनेमा आहे. यात विजय एका कॉलेज प्रोफेसरच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने थलपती विजय व विजय सेतुपती हे दोन दिग्गज सुपरस्टार पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.

Web Title: master advance booking thalapathy vijays film received houseful shows ahead of its release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :TollywoodTollywood