५०व्या वर्षी बाबा झाला मसाबा गुप्ताचा Ex नवरा! पत्नी ८ वर्षांनी आहे लहान, गोंडस बाळाला दिला जन्म
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 13:08 IST2026-03-23T13:07:56+5:302026-03-23T13:08:19+5:30
बॉलिवूडचे लोकप्रिय निर्माते आणि मसाबा गुप्ताचा एक्स पती मधु मंटेना बाबा झाले आहेत. त्यांच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मधु मंटेना यांनी ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे.

५०व्या वर्षी बाबा झाला मसाबा गुप्ताचा Ex नवरा! पत्नी ८ वर्षांनी आहे लहान, गोंडस बाळाला दिला जन्म
बॉलिवूडचे लोकप्रिय निर्माते आणि मसाबा गुप्ताचा एक्स पती मधु मंटेना बाबा झाले आहेत. त्यांच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मधु मंटेना यांनी ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. लग्नानंतर दोन वर्षांनी त्यांच्या घरी पाळणा हलला आहे. वयाच्या ५०व्या वर्षी मधु मंटेना पहिल्यांदा बाबा झाले आहेत. त्यामुळे ते आनंदी आहेत. मधु मंटेना यांची पत्नी ईरा त्रिवेदी हिने २१ मार्च रोजी गोंडस बाळाला जन्म दिला. त्यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे.
मधु मंटेना यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. "आमच्यावर कृपा केल्याबद्दल आणि आमच्या आयुष्यात आनंद दिल्याबद्दल भगवान श्रीकृष्ण आम्ही तुमचे आभारी आहोत. नवरात्रीच्या दिवसांत ईदच्या दिवशी ईरा आणि मला पुत्ररत्न झालं", असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांच्या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रिटींनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
मधु मंटेना यांची पत्नी ईरा त्यांच्यापेक्षा ८ वर्षांनी लहान आहे. ती एक योग स्पेशालिस्ट आणि लेखिका आहे. ईरासोबत २०२३ मध्ये मधु मंटेना यांनी लग्न केलं होतं. त्याआधी त्यांनी फॅशन डिझायनर मसाबा गुप्तासोबत संसार थाटला होता. २०१५ मध्ये त्यांनी लग्न केलं होतं. मात्र ४ वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला. २०१९ मध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले.