ऋषी कपूरच्या लग्नात कोणाच्या नावाचे कुंकू लावून आली होती रेखा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2017 16:50 IST2017-08-24T11:17:04+5:302017-08-24T16:50:00+5:30

बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांचे आयुष्य अनेक अर्थांनी वादग्रस्त ठरले आहे. कारण आजही चित्रपटांपेक्षा त्यांच्या लव्ह लाइफवरच अधिक चर्चा रंगते. ...

In the marriage of Rishi Kapoor, who was named Kukuma? | ऋषी कपूरच्या लग्नात कोणाच्या नावाचे कुंकू लावून आली होती रेखा?

ऋषी कपूरच्या लग्नात कोणाच्या नावाचे कुंकू लावून आली होती रेखा?

लिवूड अभिनेत्री रेखा यांचे आयुष्य अनेक अर्थांनी वादग्रस्त ठरले आहे. कारण आजही चित्रपटांपेक्षा त्यांच्या लव्ह लाइफवरच अधिक चर्चा रंगते. कधी अमिताभ यांच्याशी असलेल्या अफेअरमुळे, तर कधी पतीच्या सुसाइडमुळे रेखा चर्चेत राहिल्या आहेत. एकदा तर रेखाच्या कपाळावर असलेल्या कुंकूमुळेही त्या वादाच्या भोवºयात सापडल्या होत्या. कारण त्यावेळी प्रत्येकांनाच प्रश्न पडला होता की, अखेर रेखा यांनी लग्न कोणाबरोबर केले? त्यांच्या कपाळावर असलेले कुंकू आणि गळ्यातील मंगळसूत्र कोणाच्या नावाचे आहे? असे प्रश्न त्याकाळी उपस्थित करण्यात आले होते. 

रेखा यांच्या ‘रेखा : द अनटोल्ड स्टोरी’ या आॅटोबायोग्राफीमध्ये या रहस्याचा उलगडा करण्यात आला आहे. रेखाच्या या बायोग्राफीचे लेखक यासिर उस्मान आहेत. २२ जानेवारी १९८० ची ही घटना आहे. यादिवशी अभिनेते ऋषी कपूर आणि नितू सिंग यांचा विवाह होता. रेखा नितूची क्लोज मैत्रिण आहेत. त्यामुळेच त्या लग्नात पोहोचल्या होत्या. जेव्हा रेखा लग्नसोहळ्यात आल्या, तेव्हा त्यांच्याकडे बघून सगळ्यांनाच धक्का बसला. कारण रेखा यांच्या कपाळावर कुंकू झळकत होते. शिवाय त्यांच्या गळ्यात मंगळसूत्रही होते. याच कार्यक्रमात महानायक अमिताभ बच्चनही परिवारासमवेत पोहोचले होते. अशात रेखा यांच्या कपाळावरील कुंकवाची चर्चा रंगणार यात शंका नव्हती. 

पांढरी साडी, चमकदार लाल बिंदी आणि कुंकूमध्ये रेखा खूपच सुंदर दिसत होत्या. मात्र त्यांचा अवतार इतरांना अचंबितही करीत होता. विशेष म्हणजे जेव्हा रेखा लग्नसोहळ्यात पोहोचल्या तेव्हा उपस्थित छायाचित्रकारांनी ऋषी आणि नितू यांच्याऐवजी रेखा यांचेच फोटो काढण्यास सुरुवात केली. मात्र प्रत्येकाला रेखा यांनी लग्न केले तरी कोणाशी? हा प्रश्न सतावत होता. सिने ब्लिट्जच्या रिपोर्टनुसार, ऋषी आणि नितू यांना शुभेच्छा दिल्यानंतर रेखा आरके स्टुडिओच्या गार्डनमध्ये पोहोचल्या. तेथून त्या वारंवार अमिताभ यांच्याकडे बघत होत्या. थोड्या वेळानंतर त्या मैत्रिणीबरोबर अमिताभ यांच्याजवळ गेल्या. यादरम्यान, दोघांमध्ये चर्चाही झाली. 



स्टारडस्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, अमिताभ यांच्या पत्नी जया बच्चन यांनी बºयाचवेळ दोघांच्या चर्चेकडे दुर्लक्ष केले. मात्र थोड्या वेळानंतर जया खाली मान घालून रडू लागल्या. मात्र उपस्थितांना हा सर्व प्रकार कळेनासा झाला होता. पुढे रेखानेच यावर स्पष्टीकरण दिले होते. त्यांनी म्हटले होते की, ‘त्या सायंकाळी मी शूटिंग उरकून थेट विवाहस्थळी पोहोचली होती. कपाळावरील कुंकू आणि मंगळसूत्र माझ्या चित्रपटातील गेटअप होता. घाईघाईमध्ये मी मंगळसूत्र आणि कपाळावरील कुंकू पुसण्यास विसरली होती. 

तर पुनित इस्सरच्या पत्नी दीपाली इस्सरने म्हटले होते की, रेखा अमिताभच्या नावाने कुंकू लावायच्या. याच मुद्द्यावर एका पुरस्कार सोहळ्यात रेखाने म्हटले होते की, कपाळ्यात सिंदूर (कुंकू) लावणे मी फॅशनचा भाग समजते. २००८ मध्ये एका मुलाखतीत तर त्यांनी म्हटले होते की, यावरून लोक माझ्याबद्दल काय बोलतात याचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही. 

Web Title: In the marriage of Rishi Kapoor, who was named Kukuma?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.