नवरात्रीच्या मुहूर्तावर राणी मुखर्जीच्या 'मर्दानी ३'चं नवं पोस्टर आलं समोर, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 13:10 IST2025-09-22T13:09:55+5:302025-09-22T13:10:38+5:30

राणी मुखर्जीचा 'मर्दानी ३' कधी प्रदर्शित होणार? जाणून घ्या...

Mardaani 3 Poster Out On Navratri Rani Mukerji Back In Action As Shivani Shivaji Roy Check Release Date | नवरात्रीच्या मुहूर्तावर राणी मुखर्जीच्या 'मर्दानी ३'चं नवं पोस्टर आलं समोर, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?

नवरात्रीच्या मुहूर्तावर राणी मुखर्जीच्या 'मर्दानी ३'चं नवं पोस्टर आलं समोर, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?

Rani Mukerji Returns As Shivani Shivaji Roy In Mardaani 3 : बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी (Rani Mukerji) वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी ओळखली जाते. राणीच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर आणि प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. त्यापैकी एक चित्रपट म्हणजे 'मर्दानी'.  २०१४ साली आलेल्या 'मर्दानी' या चित्रपटातून राणी मुखर्जी पोलीस अधिकारी शिवानी रॉय या भूमिकेतून मोठ्या पडद्यावर आली आणि तिने प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने थक्क केले.  त्यानंतर 'मर्दानी' चित्रपटाचा दुसरा भाग २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता.  या दोन्ही चित्रपटांच्या प्रचंड यशानंतर, तिसरा थरारक भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बहुप्रतिक्षित चित्रपट 'मर्दानी ३'चं नवं पोस्टर समोर आलं आहे. ज्यामुळे चाहते खूप उत्साहित झाले आहेत.

नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर यशराज फिल्म्सने बहुचर्चित चित्रपट 'मर्दानी ३'चं नवं पोस्टर लाँच केलं आहे. यात राणी मुखर्जीच्या हातात पिस्तूल असल्याचं दिसतंय. कॅप्शमध्ये लिहलंय, "नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, वाईटावर चांगल्याच्या विजयाचा उत्सव साजरा करू या... राणी मुखर्जी टॉप पोलीस अधिकारी शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेतून परतत आहे. शिवानी शिवाजी रॉय तिच्या करिअरमधील सर्वात आव्हानात्मक प्रकरणाची चौकशी करणार आहे". 


 कधी प्रदर्शित होणार चित्रपट?

'मर्दानी' ही भारतातील एकमेव यशस्वी फ्रँचायझी आहे. 'मर्दानी' (२०१४) आणि 'मर्दानी २' (२०१९) या दोन्ही चित्रपटांमध्ये समाजामध्ये घडणाऱ्या गुन्ह्यांवर प्रकाश टाकला होता. 'मर्दानी'च्या पहिल्या भागात अल्पवयीन मुलींची तस्करी, यामध्ये सहभागी असलेले राजकारणी यावर प्रकाशझोत टाकण्यात आला होता. तर, 'मर्दानी'च्या दुसऱ्या भागात स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर बंधने घालणारी वृत्ती, त्यांना नेहमीच पायाची धूळ समजणाऱ्या पुरुषसत्तावादी प्रवृ्त्तींवर भाष्य करण्यात आले होते. आता, 'मर्दानी'च्या तिसऱ्या भागात कोणत्या विषयाला हात टाकण्यात येणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.  या चित्रपटात आणखी कोणते कलाकार असणार, याबाबत 'यशराज फिल्मस'ने कोणतेही भाष्य केले नाही.  'मर्दानी'चं दिग्दर्शन अभिराज मिनावाला करत आहेत आणि याचे निर्माते आदित्य चोप्रा आहेत. हा चित्रपट २७ फेब्रुवारी २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Mardaani 3 Poster Out On Navratri Rani Mukerji Back In Action As Shivani Shivaji Roy Check Release Date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.