मराठमोळा बाॅडी बिल्डर झळकणार अजय देवगणच्या 'भोला' सिनेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 10:01 PM2023-03-28T22:01:56+5:302023-03-28T22:02:12+5:30

Bhola Movie : अजय देवगणचा 'भोला' या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Marathmola body builder will be seen in Ajay Devgn's 'Bhola' | मराठमोळा बाॅडी बिल्डर झळकणार अजय देवगणच्या 'भोला' सिनेमात

मराठमोळा बाॅडी बिल्डर झळकणार अजय देवगणच्या 'भोला' सिनेमात

googlenewsNext

अजय देवगण(Ajay Devgn)चा 'भोला' (Bhola Movie) या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २००२ मध्ये मि. इंडिया बनल्यानंतर महाराष्ट्र श्री, भारत श्री, मुंबई श्री असे बॅाडीबिल्डींगमधील मानाच्या पुरस्कारांवर नाव कोरणारा मराठमोळा बाॅडीबिल्डर-अभिनेता केतन करंडे (Ketan Karande) या चित्रपटात झळकणार आहे. शाहरुख खानच्या 'असोका'मधून सिनेइंडस्ट्रीत दाखल झालेल्या केतनने 'भोला'मध्ये कच्छा गँग बॅास नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. 

'अॅक्शन जॅक्सन'च्या निमित्तानं सर्वप्रथम अजय आणि केतन यांची भेट झाली होती. 'जोधा अकबर', 'पानीपत', 'ठग्ज आॅफ हिंदोस्तान', 'रेस २' सारखे बरेच चित्रपट केतननं केले आहेत. 'भोला'बाबत केतन म्हणाला की, ऑडीशनद्वारे मला हा रोल मिळाल्यानंतर अजयनं बोलावून घेतलं आणि स्टोरी व रोल समजावून सांगितला. यात माझा ओपन बाॅडी सिक्वेन्स आहे. त्यामुळे बाॅडीचा कलर टोन बदलण्यासाठी २५-३० दिवस उन्हात झोपलो. बाॅडी बनवून अजयसमोर गेलो तेव्हा ते पाहून थक्क झाले. २५ हैदराबाद आणि १५ दिवस मुंबईत शूट केलं. अजयनं मला लक्ष्मी रायच्या आयटम साँगमध्येही संधी दिली. त्यात डान्सही केल्याचं केतन म्हणाला. बाॅडीबिल्डींगसोबतच केतन तरुण-तरुणींसोबतच चाळीसीतील लोकांना व्यायाम आणि निर्व्यसनी जीवन व फिटनेसचे धडे देण्याचे काम करतो. 


सध्या ‘भोला’ची जबदस्त क्रेझ पाहायला मिळतेय. सोशल मीडियावरही याच सिनेमाची चर्चा आहे. सिनेमाचा ट्रेलर जबरदस्त हिट झाल्यानंतर आता ‘भोला’च्या ॲडव्हान्स बुकिंगलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटाच्या निमित्ताने अजय व तब्बू (Tabu) पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळणार आहे. दोघंही चित्रपटात धमाकेदार ॲक्शन करताना दिसणार आहेत. अजय देवगण आणि तब्बू यांच्याशिवाय संजय मिश्रा, किरण कुमार, अमला पॉल यांच्याही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Web Title: Marathmola body builder will be seen in Ajay Devgn's 'Bhola'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.