"सिनेमा न पाहताच टीका का करता?" नसीरुद्दीन शाहांना पल्लवी जोशीचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 11:32 AM2023-09-14T11:32:37+5:302023-09-14T11:36:12+5:30

मी नसीर साहेबांना ओळखते.

marathi actress pallavi joshi questions naseeruddin shah why he is targetting kashmir files film without even watching | "सिनेमा न पाहताच टीका का करता?" नसीरुद्दीन शाहांना पल्लवी जोशीचा सवाल

"सिनेमा न पाहताच टीका का करता?" नसीरुद्दीन शाहांना पल्लवी जोशीचा सवाल

googlenewsNext

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांनी काही सिनेमांवर हल्लाबोलच चढवला आहे. 'द काश्मीर फाईल्स', 'द केरळ स्टोरी' आणि 'गदर 2' वरही त्यांनी टीका केली. 'काश्मीर फाईल्स' हा सिनेमा तर आधीपासूनच त्यांच्या टार्गेटवर होता. सिनेमा न पाहताच त्यांनी तीव्र विरोध दर्शवला. आता नुकतंच त्यांनी पुन्हा सिनेमावर टीका केली. ज्यावर मराठी अभिनेत्री आणि निर्माते विवेक अग्निहोत्री यांची पत्नी पल्लवी जोशी (Pallavi Joshi) भडकली आहे.

पल्लवी जोशीने नसीरुद्दीन शाह यांना कोणतीही टीका करण्याआधी सिनेमा पाहा अशी विनंती केली. ती म्हणाली, "नसीरजी जे काही म्हणतात ते सोशल मीडियावर प्रसारित होतं. मी सोशल मीडियावर आहे म्हणूनच मी त्यांचं मत वाचलं आहे. पण मी वैयक्तिक बघितलेलं नाही. नसीर साहेब काश्मीर फाईल्स बद्दल जे बोलत आहेत माझी त्यांना एकच विनंती आहे की आधी त्यांनी सिनेमा बघावा आणि नंतर त्यांनी मत मांडावं."

ती पुढे म्हणाली, "ते जसा विचार करत आहेत काश्मीर फाईल्स तसा सिनेमा नाहीए.आयुष्यात या स्टेजपर्यंत पोहोचल्यावर मला असं वाटतं की केवळ ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवणं योग्य नाही. तुम्ही जे ऐकता त्यावर आंधळा विश्वास ठेवणं चांगलं नाही. जेव्हा मी कोणत्याही गोष्टीवर बोलते तेव्हा मी त्या विषयाचा पूर्ण अभ्यास करते. जर मला एखाद्या सिनेमावर बोलायचं असेल मग तो काश्मीर फाईल्स किंवा अजून कोणता असेल तर मी सर्वात आधी सिनेमा बघेन."

"मी नसीरुद्दीन शाह यांच्या टिप्पणीमुळे दु:खी झाली आहे. मी त्यांचा आदर करते. ते खूप चांगले कलाकार आहेत. मी त्यांना सिनेमा बघण्यासाठी विनंती करते. आम्ही अनेक सिनेमांत सोबत काम केलं आहे म्हणूनच मी त्यांना चांगली ओळखते.जर ते सिनेमा न पाहताच कमेंट करत असतील तर काय करणार जग असंच आहे" असंही ती म्हणाली.

विवेक अग्निहोत्री यांचा आगामी 'द व्हॅक्सीन वॉर' सिनेमा प्रदर्शित होतोय. यामध्ये पल्लवी जोशीसह नाना पाटेकर, अनुपम खेर मुख्य भूमिकेत आहेत. 28 सप्टेंबर रोजी सिनेमा रिलीज होणार आहे.

Web Title: marathi actress pallavi joshi questions naseeruddin shah why he is targetting kashmir files film without even watching

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.