मनोज वाजपेयीनंतर त्याच्या पत्नीलाही कोरोनाची लागण; म्हणाला, हा आमच्यासाठी कठीण काळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2021 10:30 IST2021-03-21T10:29:09+5:302021-03-21T10:30:47+5:30

अलीकडे एका इव्हेंटमध्ये मनोज वाजपेयी काहीसा संतापलेला दिसला होता. इतर कोणी नियम पाळले नाहीत, निष्काळजीपणा दाखवला म्हणून मी कोरोनाचा शिकार झालो, असे तो म्हणाला होता.

manoj bajpayee on battling covid 19 says quite tough for both me and my wife | मनोज वाजपेयीनंतर त्याच्या पत्नीलाही कोरोनाची लागण; म्हणाला, हा आमच्यासाठी कठीण काळ

मनोज वाजपेयीनंतर त्याच्या पत्नीलाही कोरोनाची लागण; म्हणाला, हा आमच्यासाठी कठीण काळ

ठळक मुद्देमनोज वाजपेयीआधी ‘डिस्पॅच’च्या दिग्दर्शकाला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे मनोज वाजपेयीची टेस्ट केली गेली आणि तो सुद्धा पॉझिटीव्ह आढळला होता.

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरु असताना आता बॉलिवूडमध्येही कोरोनाचे संक्रमण वेगात पसरताना दिसतेय. काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयीला कोरोनाची लागण झाली होती. आता त्याची पत्नी नेहा हिला सुद्धा कोरोनाचे संक्रमण झाले आहे.

काल एका व्हर्च्युअल मुलाखतीत मनोज वाजपेयीने त्याच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. आरोग्याच्यादृष्टीने हा माझ्या व माझ्या पत्नीसाठी कठीण काळ आहे. रिकव्हरी थोडी संथ आहे. पण आम्ही आधीपेक्षा बरे आहोत. आम्ही 12 दिवसांचा क्वारंटाईन पीरियड पूणृ केला आहे. सध्या मी घरीच आहे. यापेक्षा जास्त मी काहीच करू शकत नाहीये. माझी फायनल टेस्ट निगेटीव्ह येण्याची वाट पाहतोय, असे तो म्हणालो.
अलीकडे एका इव्हेंटमध्ये  इतरांच्या चुकीची शिक्षा मी भोगतोय, असे म्हणत मनोज वाजपेयी काहीसा संतापलेला दिसला होता.    इतर कोणी नियम पाळले नाहीत, निष्काळजीपणा दाखवला म्हणून मी कोरोनाचा शिकार झालो. कोव्हिड 19 चे सर्व नियम काटेकोरपणे पाळले गेले असते तर काहीही अडचण नव्हती. प्रॉडक्शन हाऊसने याची काळजी घ्यायला हवी. प्रत्येक व्यक्तिने प्रोटोकॉल फॉल केला पाहिजे, याबाबत दक्ष असले पाहिजे. कोरोनाचे नियम पाळू तेव्हाच आपण चित्रपट पूर्ण करू शकतो. सॅनिटायजर व मास्क आपल्या आयुष्याची गरज बनली आहे. यासोबतच आपल्याला काम करायचे आहे,’ असे मनोज म्हणाला होता.

मनोज वाजपेयीआधी ‘डिस्पॅच’च्या दिग्दर्शकाला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे मनोज वाजपेयीची टेस्ट केली गेली आणि तो सुद्धा पॉझिटीव्ह आढळला होता.  मनोजच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, मनोज सध्या ‘डिस्पॅच्ड’ या सिनेमात बिझी आहे. त्याचा हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार आहे. मनोजच्या‘द फॅमिली मॅन’ या वेबसीरिजचा दुसरा सीझनही लवकरच प्रेक्षकांचा भेटीस येणार आहे. हा दुसरा सीझन आधी 12 फेबु्रवारीला रिलीज होणार होता. मात्र ‘तांडव’ या वेबसीरिजवरील वादानंतर ‘द फॅमिली मॅन 2’ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.  ‘सायलन्स- कॅन यू हिअर इट’ या सिनेमातही मनोज दिसणार आहे. त्याचा हा सिनेमाही ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: manoj bajpayee on battling covid 19 says quite tough for both me and my wife