Mandira Bedi : 'आज २४ वर्ष झाले असते..' पतीच्या आठवणीत मंदिरा बेदी भावूक, शेअर केली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 12:44 PM2023-02-15T12:44:24+5:302023-02-15T13:09:47+5:30

२ वर्षांपूर्वीच मंदिरा बेदीच्या पतीचे निधन झाले.

Mandira Bedi remembers late husband raj kaushal on 24 th wedding anniversary | Mandira Bedi : 'आज २४ वर्ष झाले असते..' पतीच्या आठवणीत मंदिरा बेदी भावूक, शेअर केली पोस्ट

Mandira Bedi : 'आज २४ वर्ष झाले असते..' पतीच्या आठवणीत मंदिरा बेदी भावूक, शेअर केली पोस्ट

googlenewsNext

Mandira Bedi : बॉलिवूडपासून ते क्रिकेट विश्वापर्यंत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री आणि सूत्रसंचालिका मंदिरा बेदीसोशल मीडियावर कायम सक्रिय असते. दीर्घकाळानंतर ती पुन्हा क्रिकेट क्षेत्रातील कार्यक्रमांमध्ये परतली आहे. २ वर्षांपूर्वीच तिच्या पतीचे निधन झाले. आज तिच्या लग्नाच्या वाढदिवसाला २४ वर्ष पूर्ण झाली आहेत. 'आज २४ वर्ष झाले असते' असं म्हणत पतीच्या आठवणीत मंदिरा भावूक झाली आहे.

मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचे ३० जून २०२१ रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. मंदिरा एकटीच दोन्ही मुलांचे पालन करत आहे. १४ फेब्रुवारीला जेव्हा सर्वजण व्हॅलेटाईन डे साजरा करतात तेव्हाच मंदिरा मात्र पतीच्या आठवणीत भावूक होते. मंदिराने १४ फेब्रुवारी या दिवशीच राज कौशलसोबत लग्नगाठ बांधली होती. तिने पतीसोबतच्या अनेक फोटोंचा मिळून एक व्हिडिओ केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देत तिने लिहिले, 'आज २४ वर्ष झाले असते.'

मंदिराने पोस्ट केलेल्या या व्हिडिओवर अनेक कलाकारांनी कमेंट करत तिला धीर दिला आहे. मृणाल ठाकूर, ताहिरा कश्यप, स्मृती इराणी, अर्जुन बिजलानी यांनी मंदिराच्या पोस्टवर हार्ट इमोजी कमेंट केल्या आहेत. 

१९९६ साली मंदिरा आणि राज यांची ओळख झाली होती. भेटीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर  १४ फेब्रुवारी १९९९ साली त्यांनी लग्नगाठ बांधली. राज आणि मंदिराने आर्य समाजच्या हिंदू रितीनुसार आणि नंतर आनंद कारज समारोहमध्ये दोन वेळा लग्नगाठ बांधली. लग्नानंतर १२ वर्षांनी मंदिराने १९ जून २०११ रोजी मुलाला जन्म दिला. त्याचे नाव वीर असे आहे. तर २८ जुलै २०२० रोजी त्यांनी एका मुलीला दत्तक घेतले. तिचे नाव तारा असे आहे.दोघेही चांगल्या वाईट परिस्थितीत एकमेकांसोबत उभे राहिले. 

Web Title: Mandira Bedi remembers late husband raj kaushal on 24 th wedding anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.