पती राज कौशल यांच्या निधनानंतर मंदिरा बेदीनं उचललं ‘हे’मोठं पाऊल, चाहते शॉक्ड!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 12:29 IST2021-07-04T12:27:33+5:302021-07-04T12:29:03+5:30

राज गेल्यानंतर मंदिरानं आता तिच्या इन्स्टाग्रामवर काही बदल केले आहेत...

mandira bedi changes her instagram dp after her husband raj kaushal death | पती राज कौशल यांच्या निधनानंतर मंदिरा बेदीनं उचललं ‘हे’मोठं पाऊल, चाहते शॉक्ड!!

पती राज कौशल यांच्या निधनानंतर मंदिरा बेदीनं उचललं ‘हे’मोठं पाऊल, चाहते शॉक्ड!!

ठळक मुद्देमंदिरा आणि राज यांची मुलंही प्रार्थना सभेला आली होती. गेल्या वर्षीच राज आणि मंदिरानं एका मुलीला दत्तक घेतलं होतं.

‘शांती’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मंदिरा बेदी (Mandira Bedi) पती राज कौशल  (Raj Kaushal) यांच्या निधनानंतर कोलमडून गेलीये. तिच्या दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गेल्या 30 रोजी मंदिराचा पती राज यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर मंदिरा रात्रंदिवस रडतेय. तिच्या डोळ्यांतील अश्रू थांबत नाहीयेत. शनिवारी राज यांच्यासाठी प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं. पतीच्या निधनानंतर मंदिरानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही बदल केले आहेत.   प्रोफाइल फोटो काढून तिने त्या जागी काळ्या रंगाचा फोटो ठेवला आहे. ट्विटरवर मात्र तिने काहीही बदल केलेला नाही.

राज यांच्या प्रार्थना सभेत बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले. या प्रार्थना सभेनंतर राजचा फोटो शेअर करताना मंदिराची मैत्रीण मौनी रॉयनं एक भावुक पोस्ट शेअर केली. आम्ही सगळे तुला खूप मिस करतोय आणि आता काहीही आधीसारखं राहणार नाही, असं मौनीनं लिहिलं.



मंदिरा आणि राज यांची मुलंही प्रार्थना सभेला आली होती. गेल्या वर्षीच राज आणि मंदिरानं एका मुलीला दत्तक घेतलं होतं.
राज कौशल यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. आपल्याला हृदयविकाराचा झटका येतोय, याची जाणीव राज यांना मृत्यूच्या काही तास आधीच झाली होती. मंदिराला त्यांनी तसं सांगितलं होतं. रात्री त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि रूग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली होती. राज यांच्या अकाली जाण्यानं मंदिराला प्रचंड मोठा धक्का बसला आहे. 
 राज कौशल दिग्दर्शक आणि निर्माते होते. राज यांनी 2 चित्रपट दिग्दर्शित केले आणि 3 चित्रपटांची निर्मिती केली आहे. राजनं अँथनी कौंन है, प्यार में कभी कभी और शादी का लड्डू अशा चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्याच वेळी त्यांनी बेखुदी चित्रपटातील स्टंट दिग्दर्शित केले.

Web Title: mandira bedi changes her instagram dp after her husband raj kaushal death