मंदिरा बेदी आणि राज कौशलचा आलिशान व्हिला आता मिळणार रेंटवर, इतके मोजावे लागतील पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 11:47 IST2021-07-03T11:46:46+5:302021-07-03T11:47:14+5:30

राज कौशल यांच्या निधनामुळे बेदी आणि कौशल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Mandira Bedi and Raj Kaushal's luxurious villa will now be available for rent | मंदिरा बेदी आणि राज कौशलचा आलिशान व्हिला आता मिळणार रेंटवर, इतके मोजावे लागतील पैसे

मंदिरा बेदी आणि राज कौशलचा आलिशान व्हिला आता मिळणार रेंटवर, इतके मोजावे लागतील पैसे

बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदीचा नवरा राज कौशल यांचे बुधवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. ते ४९ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे बेदी आणि कौशल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशात मंदिरा आणि राज यांच्या अनेक गोष्टी समोर येत आहेत. विशेष बाब म्हणजे मंदिरा आणि राज यांचे मुंबईपासून जवळ असलेल्या मढ बेटावर एक भव्य बंगला विकत घेतला होता. आता मंदिराने हा बंगला रेंटवर देण्याचा निर्णय घेतला आहे.

मंदिरा बेदी आणि राज कौशल यांच्या आलिशान बंगल्याचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. मंदिरा आणि राज यांचा हा बंगला सी फेसिंग आहे. त्यामुळे फोटोंमध्ये घरातील सी व्ह्यू सुंदर दिसत आहे.

या बंगल्यामध्ये एक स्विमिंगपूल, ४ बेडरूम आणि ५ बाथरूम आहेत. या घरात एक दिवस राहाण्याचे भाडे ४२ हजार रूपये असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार  हा भव्य बंगला मंदिरा आणि तिच्या आईने मिळून खरेदी केला होता. या बंगल्यामध्ये अनेक चित्रपटांचे शूटिंग देखील करण्यात आले आहे. 


मंदिरा बेदी आणि राज कौशल यांनी १९९९ साली लग्न केले. २०११ साली त्यांनी एका मुलाला जन्म दिला तर मागील वर्षी त्यांनी एक ४ वर्षांची मुलगी दत्तक घेतली होती. राज यांनीही दोनच दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती ज्यात ते पार्टी करताना दिसत आहेत तर त्यात मंदिरा आणि त्यांचे काही मित्र ही पहायला मिळत आहेत.

Web Title: Mandira Bedi and Raj Kaushal's luxurious villa will now be available for rent