कंगनाने निवडणुकीपूर्वी घेतली 'इतकी' महागडी कार! किंमत एकूण बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 04:36 PM2024-04-08T16:36:53+5:302024-04-08T16:37:14+5:30

कंगना तिच्या नवीन कारमध्ये फिरताना दिसून येत आहे. 

Mandi Lok Sabha Seat Kangana Ranaut Reached Mumbai Amid Election Campaign Bought New Mercedes Car | कंगनाने निवडणुकीपूर्वी घेतली 'इतकी' महागडी कार! किंमत एकूण बसेल धक्का

कंगनाने निवडणुकीपूर्वी घेतली 'इतकी' महागडी कार! किंमत एकूण बसेल धक्का

हिमाचलच्या मंडी लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत निवडणूक प्रचारादरम्यान मुंबईत दिसली. राजकारणात प्रवेश करताच कंगनाने एक नवी कोरी गाडी खरेदी केली आहे.  याचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कंगना तिच्या नवीन कारमध्ये फिरताना दिसून येत आहे. 

कंगनानं  तब्बल 2.43 कोटी रुपयांची नवी कार खरेदी केली आहे. ही काही  सामान्य कार नसून र्सिडीज मेबॅक जीएलएस कार (Mercedes-Maybach GLS) आहे. ही एक लक्झरी कार आहे. ही भारतात विकली जाणारी सर्वांत महागडी  कार आहे. कंगना ही महागड्या गाड्यांची शौकीन आहेकंगनाच्या कार कलेक्शनमध्ये या नव्या कारचा समावेश झाला आहे.

कंगनाकडे पहिलीही मर्सिडीज कारच आहे. त्या कारची किंमत ३.६ कोटी रुपये आहे. आता तिनं खरेदी केलेली ही नवी कोरी मर्सिडीज पांढऱ्या रंगाची आहे. गाडीला मॅचिग अशा लूकमध्ये कंगना दिसून आली. तिनं पांढऱ्या रंगाचा ड्रेस आणि काळा गॉगलमध्ये ती अगदी स्टायलीश दिसत आहे.  कंगना तिच्या कारमधून बाहेर येताच पापाराझींनी तिच्याकडे कॅमेरे फिरवले. यावेळी कंगनाने सर्व पापाराझींना हात देखील दाखवला.

गेल्या काही काळापासून कंगना ही तिच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केल्यामुळे चर्चेत आहे. तिनं नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पक्षाने तिला लोकसभा निवडणुकीत मंडी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तिच्या फिल्मी लाइफबद्दल बोलायचं झाले तर ती शेवटची 'तेजस' चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट ऑक्टोबर 2023 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता, पण तो फ्लॉप ठरला. आता ती 14 जूनला प्रदर्शित होणाऱ्या 'इमर्जन्सी'मध्ये दिसणार आहे.

Web Title: Mandi Lok Sabha Seat Kangana Ranaut Reached Mumbai Amid Election Campaign Bought New Mercedes Car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.