‘राम तेरी गंगा मैली’ची मंदाकिनी आज दिसते अशी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 16:57 IST2017-09-11T11:27:15+5:302017-09-11T16:57:15+5:30

‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातून एका रात्रीत प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री मंदाकिनी आठवतेय. मंदाकिनीला या एका चित्रपटाने कधी नव्हे ...

Mandakini 'Ram Teri Ganga Malli' looks like today! | ‘राम तेरी गंगा मैली’ची मंदाकिनी आज दिसते अशी!

‘राम तेरी गंगा मैली’ची मंदाकिनी आज दिसते अशी!

ाम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातून एका रात्रीत प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री मंदाकिनी आठवतेय. मंदाकिनीला या एका चित्रपटाने कधी नव्हे इतकी प्रसिद्धी, ग्लॅमर दिले. या चित्रपटातील तिच्या अभिनयाची जितकी प्रशंसा झाली, तितकीच तिने यात दिलेल्या बोल्ड दृश्यांचीही चर्चा झाली.  ‘राम तेरी गंगा मैली’ सुपरहिट झाला आणि मंदाकिनीच्या दारापुढे फिल्ममेकर्सच्या रांगा लागल्या. यानंतर मंदाकिनी अनेक चित्रपटांत दिसली. पण करिअर ऐनभरात असताना अचानक बॉलिवूडमधून दिसेनासीही झाली.



कधीकाळी आपल्या बोल्ड अदांनी सिनेप्रेमींच्या मनावर राज्य करणारी हीच मंदाकिनी आज कशी दिसते? काय करते, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मंदाकिनीने तिचा लेटेस्ट फोटो फेसबुकवर शेअर केला आहे. अर्थात हे तिचे वेरिफाईड अकाऊंड नाहीय.
मंदाकिनीचा जन्म एका अ‍ॅग्लो- इंडियन कुटुंबात झाला. तिचे खरे नाव यास्मिन जोसेफ आहे. बॉलिवूडमध्ये यास्मिनची मंदाकिनी झाली. पण मंदाकिनीचा बॉलिवूडचा प्रवास फार छोटा राहिला.  ‘राम तेरी गंगा मैली’ हा तिचा पहिला चित्रपट. यानंतर अनेक चित्रपट केलेत आणि एकाएक  बॉलिवूडमधून दिसेनासी झाली. याचकाळात तिचे नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबतही जोडले गेले. पण मंदाकिनीने आजपर्यंत यावर खुलासा दिलेला नाही. मंदाकिनीसोबत शारजहा येथे मॅच पाहणाºया दाऊद इब्राहिमच्या फोटोने त्यावेळी बरीच खळबळ निर्माण केली होती. पण मी दाऊदला ओळखत नाही, असे सांगून मंदाकिनीने यावर बोलणे टाळले होते.
सध्या मंदाकिनी आपल्या संसारात रमली आहे. डॉ.काग्यूर टी रिनपाचे ठाकूरसोबत संसार थाटलाय. तिला दोन मुले आहेत. मुलगा रब्बील आणि मुलगी रब्जा इनाया ठाकूर. मंदाकिनी सध्या अतिशय साधे आयुष्य जगतेय. योग प्रशिक्षकासोबत ती तिबेटचे एक हर्बल सेंटर चालवतेय.

Web Title: Mandakini 'Ram Teri Ganga Malli' looks like today!