मुंबई आ जाओ...! ‘लग्न लावून द्या’ म्हणणाऱ्या 2 फुटाच्या अझीमला सलमान खानचा कॉल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 02:54 PM2021-03-15T14:54:52+5:302021-03-15T15:01:10+5:30

अझीम की तो निकल पडी... ! आता मोहम्मद अझीमला लग्नासाठी डझनांवर मुलींचे फोन येत आहेत.

UP Man Who Approached Police to Help Him Find a Bride Receives Invitation to Mumbai from Salman Khan | मुंबई आ जाओ...! ‘लग्न लावून द्या’ म्हणणाऱ्या 2 फुटाच्या अझीमला सलमान खानचा कॉल

मुंबई आ जाओ...! ‘लग्न लावून द्या’ म्हणणाऱ्या 2 फुटाच्या अझीमला सलमान खानचा कॉल

googlenewsNext
ठळक मुद्देअझीमने केलेल्या दाव्यानुसार, स्वत: सलमान खानने त्याला फोन केला. शिवाय त्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली.

कमी उंचीमुळे मुलगी मिळत नसल्यामुळे निराश झालेल्या मोहम्मद अझीम  या दोन फूट उंचीच्या युवकाने  पोलिस स्टेशनमध्ये जाऊन लग्न करून देण्यासाठी मदत मागितली. त्याची न्यूज झाली आणि काय चमत्कार, आता मोहम्मद अझीमला लग्नासाठी डझनांवर मुलींचे फोन येत आहेत. इतकेच नाही तर बॉलिवूड स्टार्सचेही फोन आल्याचा दावा मोहम्मद अझीमने केला आहे. यानंतर काय, तर अझीम मुंबईला जाण्याची तयारी करतोय.

शामलीच्या जनपत भागात मोहम्मद अझीम हा 26 वर्षांचा तरूण राहतो. जेमतेम 2 फुट उंचीच्या अझीमसाठी 21 वर्षांपासून स्थळं बघणे सूरू केले. पण कमी उंचीमुळे एकही मुलगी त्याच्यासोबत लग्न करायला तयार झाली नाही. मग काय, अझीमने चक्क महिला पोलिस ठाणे गाठत आपली कैफियत मांडली. या पोलिस ठाण्यात जात, मॅडम, माझे लग्न लावून द्या, अशी गळ घातली. एका न्यूज चॅनलने अझीमची ही कैफियत जगापुढे आणली. यानंतर काय, तर अझीमला लग्नाचे प्रस्ताव मिळू लागले. इतकेच काय, अझीमच्या कुटुंबीयांचे मानाल तर आता त्याला बॉलिवूड सेलिब्रिटींचेही फोन येत आहेत. अनेकांनी त्याला भेटायला बोलवले आहे.

सलमानचा फोन
अझीमने केलेल्या दाव्यानुसार, स्वत: सलमान खानने त्याला फोन केला. शिवाय त्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. अझीमने सांगितले, भाईजानने मला स्वत: फोन केला होता. त्यांनी मला मुंबईत बोलवेल, असे म्हटले. मी तुला भेटू इच्छितो. तू मुंबईला ये, मग भेटून बोलो, असे सलमान फोनवर मला म्हणाला.

  

Read in English

Web Title: UP Man Who Approached Police to Help Him Find a Bride Receives Invitation to Mumbai from Salman Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.