मल्लिका शेरावतवर कोसळला दुःखाचा डोंगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 19:23 IST2019-09-09T19:23:40+5:302019-09-09T19:23:56+5:30

बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Mallika Sherawat grandmother passed away | मल्लिका शेरावतवर कोसळला दुःखाचा डोंगर

मल्लिका शेरावतवर कोसळला दुःखाचा डोंगर

बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या आजीचं नुकतंच निधन झालं आहे. मल्लिकाने सोशल मीडियावर आजीचा फोटो शेअर करून ही माहिती दिली आहे. 

मल्लिका शेरावतच्या आईचं आज सकाळी निधन झालं. मल्लिकाने आजीच्या निधनाचे वृत्त सोशल मीडियावर दिली. तिने आजीसोबतचा फोटो शेअर करून लिहिलं की, आजचा दिवस माझ्यासाठी खूप दुःखद आहे. कारण माझ्या प्रेमळ आजीचं निधन झालं आहे.माझ्या आजीच्या आत्म्याला शांती मिळो.


मल्लिकाने बऱ्याच चित्रपटात काम केलं आहे. मात्र आता ती बॉलिवूडपासून दुरावली आहे. स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत मल्लिकाने बॉलिवूडपासून दुरावल्याबद्दल सांगितलं की, मला काही चित्रपटात काम मिळालं नाही कारण मी त्या चित्रपटातील हिरोंना डेट करत नव्हते. तिने पुढे सांगितलं की, सिनेइंडस्ट्रीतील हिरो व दिग्दर्शक आणि निर्मात्यांना त्यांच्या गर्लफ्रेंडसोबत काम करायचे असते. त्यामुळे तिला बऱ्याच चित्रपटातून काढून टाकण्यात आले.


मीटू मोहिमेवरही ती बोलली. ‘इंडस्ट्रीत मला कुणीही सेक्शुअल फेवर मागितला नाही. याचे कारण एकच होते. ते म्हणजे मी एक बोल्ड पर्सनॅलिटी आहे. मला असे विचारण्याची हिंमत कुणी करू श्कत नाही. मीटू मोहिम एक सकारात्मक पाऊल आहे,’ असे ती म्हणाली.

मल्लिकाची ‘बू, सबकी फटेकी’ ही वेबसीरिज एक हॉरर कॉमेडी काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यात तुषार व मल्लिकाशिवाय कॉमेडियन कृष्णा अभिषेक, किकू शारदा, शेफाली जरीवाला असे अनेक कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.

या वेबसीरिजमध्ये मल्लिका हसीना नामक मुलीची भूमिका साकारली आहे.
 

Web Title: Mallika Sherawat grandmother passed away