हेअर क्रिमची जाहिरात पडली महाग, संतापलेल्या ग्राहकाने अभिनेत्याला असा शिकवला धडा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2021 01:04 PM2021-01-06T13:04:01+5:302021-01-06T13:06:46+5:30

स्वत: वापरायचा आईने बनवलेले खास तेल, लोकांना विकायचा क्रिम

Malayalam Actor Anoop Menon Fined Rs 10,000 for Falsely Endorsing a Hair Growth Cream | हेअर क्रिमची जाहिरात पडली महाग, संतापलेल्या ग्राहकाने अभिनेत्याला असा शिकवला धडा

हेअर क्रिमची जाहिरात पडली महाग, संतापलेल्या ग्राहकाने अभिनेत्याला असा शिकवला धडा

googlenewsNext
ठळक मुद्देग्राहक मंचाने मेनन व संबंधित हेअर क्रिम कंपनीला 10-10 रूपयांचा दंड ठोठावला.

हेअर क्रिम उत्पादनाची जाहिरात करणे एका अभिनेत्याला महाग पडले. हा अभिनेता कोण तर मल्याळम अभिनेता अनूप मेनन. ग्राहक मंचानेने त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली.
होय, हेअर क्रिमच्या परिणामांची खातरजमा न करताना अनूप मेननने या उत्पादनाची जाहिरात केली. सहा आठवडे सलग वापरल्याने केस वाढतील, असा दावा या जाहिरातीत करण्यात आला होता.

फ्रान्सिस वडक्कन नामक व्यक्ति या जाहिरातीला भुलला आणि त्याने ते क्रिम खरेदी केले. सहा आठवडे नेटाने वापरले. मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही. यामुळे फ्रान्सिस संतापला आणि त्याने थेट हेअर क्रिम कंपनी व अभिनेता अनूप मेननविरोधात तक्रार दाखल करत 5 लाख रूपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली. फ्रान्सिसने 2012 मध्ये ही तक्रार दाखल केली होती.

ग्राहक मंचासमोर हे प्रकरण आले तेव्हा मी स्वत: कधीही हे हेअर क्रिम वापरले नसल्याचे अभिनेत्याने सांगितले. मी आईने घरी तयार केलेले तेल वापरतो. जाहिरातीत काय दावा केला गेला, याबद्दलही आपल्याला काहीही माहित नसल्याचे त्याने सांगितले. इतकेच नाही तर हे क्रिम हेअर ग्रोथसाठी नसून हेअर केअरसाठी आहे, असे वाटल्याने हे जाहिरात केल्याचे त्याने सांगितले.
यानंतर ग्राहक मंचाने मेनन व संबंधित हेअर क्रिम कंपनीला 10-10 रूपयांचा दंड ठोठावला.

Web Title: Malayalam Actor Anoop Menon Fined Rs 10,000 for Falsely Endorsing a Hair Growth Cream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :TollywoodTollywood