दिल्लीत बाइकवर फिरताना दिसले बॉलिवूडचे हे कपल, त्यांना कुणीच नाही ओळखले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 06:30 IST2020-02-02T06:30:00+5:302020-02-02T06:30:00+5:30

काही सेलिब्रेटी कधी रिक्षातून फिरताना दिसतात तर कधी बाइकवरून, वाचा सविस्तर

Malang Fame Aditya Roy Kapoor and Disha Patani enjoy bike ride at new delhi | दिल्लीत बाइकवर फिरताना दिसले बॉलिवूडचे हे कपल, त्यांना कुणीच नाही ओळखले

दिल्लीत बाइकवर फिरताना दिसले बॉलिवूडचे हे कपल, त्यांना कुणीच नाही ओळखले

आदित्य रॉय कपूर व दिशा पटानी गेल्या काही दिवसांपासून मलंग चित्रपटामुळे चर्चेत आले आहेत. ते दोघे पहिल्यांदाच या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. आदित्य रॉय कपूर आणि दिशा पटानी स्काय डाइविंग, सबविंग, वॉटर काइटसर्फिंग, राइडिंग क्वॉडबाइक्ससारखे अनेक एडव्हेंचर स्पोर्ट्स करताना दिसणार आहेत. त्यानंतर आता ते दोघे नुकतेच नवी दिल्लीतील रस्त्यावर बाइकवरून फिरताना दिसले. खरेतर ते दोघे मलंग चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बाइकवरून फिरत होते. 


आदित्य व दिशा स्पोर्ट्स लूकमध्ये बाइकवरून इंडिया गेटच्या अवतीभोवती फिरताना दिसले. बाइक वरून फिरताना दोघांना गोव्यातील शूटमधील आठवणी ताज्या झाल्या. जे आपल्याला ट्रेलरमध्ये पहायला मिळत आहे. 


मलंग चित्रपटातील आदित्य रॉय कपूर व दिशा पटानी यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावते आहे. या चित्रपटाच्या पोस्टरपासून ट्रेलरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. मलंग हा एक मिस्ट्री थ्रिलर चित्रपट असून यात अनिल कपूर आणि कुणाल खेमू यांच्यासोबत आदित्य रॉय कपूर आणि दिशा पटानी प्रमुख भूमिकेत आहेत. 


'मलंग' ७ फेब्रुवारीला रिलीज़ होणार आहे, ज्याचे दिग्दर्शन मोहित सूरी यांनी केले आहे. टी-सीरीज़चे भूषण कुमार, कृष्ण कुमार, लव फिल्म्सचे लव रंजन, अंकुर गर्ग आणि नॉर्दर्न लाइट्स एंटरटेनमेंटचे जे शेवक्रमणी यांची निर्मिती आहे.

आदित्य व दिशा यांची रुपेरी पडद्यावर केमिस्ट्री पाहणे कमालीचे ठरणार आहे.

Web Title: Malang Fame Aditya Roy Kapoor and Disha Patani enjoy bike ride at new delhi