मलायका अरोराचे फोटो पाहाताच नेटिझन्सने तिला म्हटले टार्जनची बहीण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 15:09 IST2020-12-31T15:08:57+5:302020-12-31T15:09:47+5:30
मलायकाचे फोटो पाहून कोणी मलायकाला कोबीची भाजी तर कोणी तिला टार्जनची बहीण म्हटले आहे.

मलायका अरोराचे फोटो पाहाताच नेटिझन्सने तिला म्हटले टार्जनची बहीण
मलायका अरोरा तिच्या फॅशन स्टेटमेंटसाठी ओळखली जाते. पण मलायकाने नुकत्याच शेअर केलेल्या एका फोटोमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. तिने हिरव्या रंगाच्या कपड्यामधील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. हे फोटो पाहून कोणी मलायकाला कोबीची भाजी तर कोणी तिला टार्जनची बहीण म्हटले आहे.
मलायका अरोरा सध्या बहीण अमृता अरोरा आणि फॅमिलीसोबत गोव्यात सुट्टी एन्जॉय करत आहे. या ट्रिपवर तिच्यासोबत बॉयफ्रेन्ड अर्जुन कपूरही आहे. मलायकाने तिचे या ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिने याआधी स्विमिंग पूलमधील फोटो शेअर केले होते. आता तिने ग्रीन ड्रेसमधील काही फोटो शेअर केले आहेत. जे बघून तिला सोशल मीडियावर ट्रोल केला जातंय. मलायका या ड्रेसमध्ये हॉट दिसत असली तरी तिचा ड्रेस पाहून तिची टर उडवली जात आहे.
मलायकाचा हा फोटो पाहून तू कोबीच्या भाजीप्रमाणे दिसत आहेस असे एकाने कमेंट केले आहे तर एकाने हे डब्बू रतनानीचे झाड आहे का असे विचारले आहे तर एकाने चक्क तू टार्झनची बहीण दिसतेस असे म्हणत तिची खिल्ली उडवली आहे. काहींनी तर जरा मोठे कपडे घालत जा... म्हणत मलायकाला सुनावले आहे.
मलायका नेहमीच डिझायनर कपडे वापरते. पण या ड्रेसची किंमत वाचली तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. तिच्या या ड्रेसची किंमत एका वेबसाईटवर केवळ ५९९९ रुपये आहे.
मलायकाने याआधी तिचे स्विमिंग पूलमधील काही फोटो पोस्ट केले होते. मलायकाला वॉटर बेबी असं म्हटलं जातं. कारण बीचवर सुट्टी एन्जॉय करण्यासोबतच तिला स्विमिंग पूलमध्ये जास्त वेळ घालवणं आवडतं. याचे कितीतरी फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तुम्हाला बघायला मिळतील. मलायकाने गोव्यातील पाण्यात एन्जॉय करतानाचे फोटो शेअर केले आहेत. स्वीमिंग पूलमध्ये तिच्यासोबत बॉयफ्रेन्ड अर्जुन कपूरही दिसत आहे.