मलायका अरोराच्या ‘गर्ल्स गँग’मध्ये झाली अर्जुन कपूरची एन्ट्री! पाहा फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 11:29 IST2018-11-16T11:28:25+5:302018-11-16T11:29:43+5:30

अगदी अलीकडे अर्जुन व मलायका हे दोघेही वरूण धवन आणि नताशा दलालसोबत डीनर डेट एन्जॉय करताना दिसले होते. आता अर्जुन कपूरची मलायकाच्या गर्ल गँगमध्ये एन्ट्री झालीय.

Malaika Arora’s girl squad has welcomed Arjun Kapoor in their gang | मलायका अरोराच्या ‘गर्ल्स गँग’मध्ये झाली अर्जुन कपूरची एन्ट्री! पाहा फोटो!!

मलायका अरोराच्या ‘गर्ल्स गँग’मध्ये झाली अर्जुन कपूरची एन्ट्री! पाहा फोटो!!

ठळक मुद्देफोटोत मलायका व अर्जुन अगदी एकमेकांना बिलगुन बसले आहेत. विशेष म्हणजे, हा फोटो महीप कपूरने शेअर केला आहे.

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर आपल्या कथित रिलेशनशिपबद्दल अद्याप काहीही बोललेले नाहीत. पण आता काहीही लपून राहिलेले नाही. सध्या दोघेही ज्याप्रमाणे एकमेकांसोबत बिनधास्त फिरताना दिसताहेत, त्यावरून तरी सगळे काही स्पष्ट आहे. अगदी अलीकडे अर्जुन व मलायका हे दोघेही वरूण धवन आणि नताशा दलालसोबत डीनर डेट एन्जॉय करताना दिसले होते. आता अर्जुन कपूरची मलायकाच्या गर्ल गँगमध्ये एन्ट्री झालीय. होय, काल अर्जुन मलायकाच्या गर्ल्स स्क्वॉडसोबत दिसला. या पार्टीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फोटोत मलायका व अर्जुन अगदी एकमेकांना बिलगुन बसले आहेत. विशेष म्हणजे, हा फोटो महीप कपूरने शेअर केला आहे. महिप ही अर्जुनची काका संजय कपूरची पत्नी आहे. म्हणजे अर्जुनची काकू आहे. फोटोत करिना कपूर, अमृता अरोरा, सोफिया चौधरी असे अनेकजण आहेत.


या फोटोवरून तरी मलायका व अर्जुन आपल्या नात्याला पुढे नेण्यास उत्सूक असल्याचे दिसताहेत. कदाचित अर्जुनच्या कुटुंबानेही या नात्याला मंजुरी दिली आहे. अर्थात मलायका व अर्जुन दोघेही यावर चुप्पी साधून आहेत. कालपरवाचं एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मलायकाने अर्जुन व तिच्या लग्नांच्या बातम्या फेटाळून लावल्या होत्या. मी माझ्या पर्सनल आयुष्याविषयी काहीही बोलणार नाही.माझ्या आयुष्यात काय चालू आहे, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. मी मात्र त्यावर बोलणार नाही, असे ती म्हणाली होती. नुकतेच ‘कॉफी विद करण 6’मध्ये करण जोहरने मलायका व अर्जुन लवकरच लग्न करणार असल्याचे संकेत त्याने दिले होते. ‘हम सभी नीचे की ओ जा रहे हैं, और ये आपकी जिंदगी में भी जल्द होने वाला है,’ असे करण मलायकाला गमतीने छेडताना म्हणाला होता. त्याचा इशारा मलायका व अर्जुनच्या लग्नाकडे होता. करणचे हे शब्द ऐकून मलायका चांगलीच लाजली होती. ‘प्लीज रूको, अभी रूको,’असे म्हणत मलायकाने करणला शांत करण्याचा प्रयत्न केला होता.
अर्जुन कपूर हा मलायकापेक्षा १० वर्षांनी लहान आहे. गेल्या काही दिवसांत मलायका आणि अर्जुन दोघेही खुल्लमखुल्ला एकत्र फिरतांना दिसत आहेत.
 

Web Title: Malaika Arora’s girl squad has welcomed Arjun Kapoor in their gang