मलायका अरोराचे चक्क दिसले होते cleavage, इव्हेंटमधून काढावा लागला होता पळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 16:26 IST2020-02-17T16:21:44+5:302020-02-17T16:26:17+5:30
मलायकाला या Oops Moment मुळे इव्हेंट सोडून जावे लागले होते.

मलायका अरोराचे चक्क दिसले होते cleavage, इव्हेंटमधून काढावा लागला होता पळ
लॅक्मे फॅशन वीकच्या पाचव्या दिवशी दिव्या खोसला कुमार रॅम्ववर उतरली. फॅशन डिझाईनर Krsna Couture साठी दिव्या शो स्टॉपर बनली. यावेळी दिव्याने फॉसिल ग्रे कलरचा सुंदर लहंगा कॅरी केला होता. त्यावर डिप फ्रंट नेकलाईन ब्लाऊज तिने घातला होता. रॅम्पवर ऐटीत रॅम्पवॉक करत असतानाच अचानक दिव्याच्या लहंग्याचे हुक तुटले. दिव्याला याचा अंदाज आला. पण हा क्षण तिने शिताफीने सांभाळला आणि रॅम्प वॉक पूर्ण केले.
दिव्याच्या आधी अनेक अभिनेत्रींना Oops Moment ना बळी पडावे लागले आहे. शिल्पा शेट्टी, नोरा फतेही, कियारा अडवाणी, यामी गौतम, सुश्मिता सेन, प्रियंका चोप्रा अशी भलीमोठी यादी आहे. मलायका अरोराची तर एका फंक्शनमध्ये इतकी वाईट अवस्था झाली होती की, फोटोग्राफर्स तिचे फोटो काढत असतानाच तिने कोणालाही काहीही न सांगता इव्हेंटमधून अक्षरशः पळ काढला होता.
मलायका एका स्टोरच्या उद्घाटनासाठी नोव्हेंबरमध्ये गेली होती. या इव्हेंटला केवळ तिनेच नव्हे तर बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला तिने लाँग पँट आणि त्यावर क्रॉप टॉप घातला होता. या टॉपवर तिने त्याच रंगाचे जॅकीट देखील घातले होते. मलायका त्या लूकमध्ये खूपच छान दिसत होती. तिने इव्हेंटला हजेरी लावताच सगळ्या कॅमेऱ्यामॅनने तिची छबी कॅमेऱ्यात टिपायला सुरुवात केली. मलायका देखील फोटोग्राफर्सना पोझ देत होती. पण पोझ देत असताना तिचा क्रॉप टॉप खूपच डिप असल्याने तिचे क्लेव्हेज स्पष्ट दिसत होते. मलायकाने टॉप सांभाळण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. टॉप जास्तच खाली येत आहे हे मलायकाच्या लक्षात येताच तिने तिथूच पळ काढला होता.