मलायका अरोराचा व्हिडीओ झाला व्हायरल, वर्कआउट करता करता भडकली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2020 15:05 IST2020-10-27T15:01:27+5:302020-10-27T15:05:34+5:30
अभिनेत्री मलायका अरोरा डंबलसोबत वर्कआउट करत आहे. पण यादरम्यान कुणीतरी काहीतरी बोलत आहे. ज्यावर मलायका त्या व्यक्तीला डंबलने मारू लागते.

मलायका अरोराचा व्हिडीओ झाला व्हायरल, वर्कआउट करता करता भडकली...
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा जेवढी तिच्या डान्ससाठी फेमस आहे तेवढीच ती फिटनेससाठीही आहे. तिने वर्कआउट करतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच तिचा एक वर्कआउट करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात मलायका जिममध्ये वर्कआउट करताना दिसत आहे. व्हिडीओत बघितलं जाऊ शकतं की, अभिनेत्री मलायका अरोरा डंबलसोबत वर्कआउट करत आहे. पण यादरम्यान कुणीतरी काहीतरी बोलत आहे. ज्यावर मलायका त्या व्यक्तीला डंबलने मारू लागते.
अभिनेत्री मलायका अरोराचा हा व्हिडीओ 'बॉलिवूड बींज' ने त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. मलायका अरोराने या व्हिडीओत ब्लू कलरचा आउटफिच घातला आहे. अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर तिचे फॅन्स भरभरून कमेंट करत आहेत. तिच्या या व्हिडीओला४५ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
दरम्यान, मलायका अरोरा डान्ससोबतच तिच्या लूक्समुळेही चर्चेत राहते. नुकतंच तिने केलेलं बोल्ड फोटोशूटही व्हायरल झालं होतं. काही दिवसांपूर्वी मलायका अरोरा कोरोना पॉझिटिव्ह निघाली होती. त्यामुळे ती इंडियाज बेस्ट डान्सर शोमधून काही दिवस गायब होती. त्यानंतर कोरोनाला मात देऊन ती परत शोमध्ये आली. सध्या ती फिटनेसवर अधिक भर देत आहे.