अरे बुआजी... कुछ तो खाया पीया करो...! मलायकाचा बोल्ड फोटो पाहून ट्रोलर्स झाले अ‍ॅक्टिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 11:07 IST2020-02-02T11:07:12+5:302020-02-02T11:07:40+5:30

बोल्ड ड्रेसमध्ये पोझ दिली अन् फसली...

malaika arora trolled in latest photoshoot user says you have no self respect | अरे बुआजी... कुछ तो खाया पीया करो...! मलायकाचा बोल्ड फोटो पाहून ट्रोलर्स झाले अ‍ॅक्टिव्ह

अरे बुआजी... कुछ तो खाया पीया करो...! मलायकाचा बोल्ड फोटो पाहून ट्रोलर्स झाले अ‍ॅक्टिव्ह

ठळक मुद्दे मलायका अनेकदा ट्रोलही झाली. पण मलायकाने या ट्रोलिंगची कधीच पर्वा केली नाही.

मलायका अरोरा फिटनेस फ्रिक मानली जाते. अभिनेत्री मलायका अरोराचा हॉटनेस आणि फिटनेस दोन्ही चर्चेत असतात. सोशल मीडियावर स्वत:चे हॉट फोटो टाकून मलायका एकीकडे चाहत्यांना घायाळ करते, दुसरीकडे तिचे फिटनेस व्हिडीओ पाहून लोकांना कुतूहल वाटते. अनेकदा ती तिचे जिम आणि योगा व्हिडीओ सुद्धा शेअर करताना दिसते. पण सध्या मलायका तिच्या फोटोशूटमुळे युजर्सच्या निशाण्यावर आली आहे. या फोटोत तिने अतिशय हॉट मिनी ड्रेस घातलेला दिसतोय. नेहमीप्रमाणे या व्हिडीओत ती कमालीची सडपातळ दिसतेय. मात्र नेमक्या याच कारणांमुळे युजर्सनी तिला ट्रोल केले आहे.


काहींनी तिच्या या फोटोंचे कौतुकही केले आहे. पण ट्रोल करणा-यांची संख्या मोठी आहे. ‘अरे बुआ जी थोडी तो शर्म कर लो,’असे या फोटोवर कमेंट करताना एकाने लिहिले. तर अन्य एकाने ‘कुछ खाया पीया करो, गोश्त हड्डी छोड रहा है, अब तो मान जाओ,’ अशा शब्दांत तिला ट्रोल केले आहे.

अर्थात या ट्रोलिंगमुळे मागे हटेल ती मलायका कुठली? काल रात्री मलायका पुन्हा एकदा तिच्या बहीणीच्या बर्थ डे पार्टीत बोल्ड अंदाजात मिरवताना दिसली. अर्जुन कपूरही तिच्यासोबत दिसला.


 मलायका सध्या अर्जुन कपूरला डेट करतेय. अर्जुन मलायकापेक्षा 11 वर्षांनी लहान आहे. यावरून मलायका अनेकदा ट्रोलही झाली. पण मलायकाने या ट्रोलिंगची कधीच पर्वा केली नाही. सध्या ती आपल्या जगात आनंदी आहे. लवकरच हे कपल लग्न करणार असे मानले जात आहे. 

Web Title: malaika arora trolled in latest photoshoot user says you have no self respect