मुंबईच्या रस्त्यावरून चक्क धावताना दिसली ही अभिनेत्री, कोणीच ओळखले नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 17:15 IST2021-03-05T17:11:07+5:302021-03-05T17:15:26+5:30
या अभिनेत्रीचा रस्त्यावरून धावतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मुंबईच्या रस्त्यावरून चक्क धावताना दिसली ही अभिनेत्री, कोणीच ओळखले नाही
ठळक मुद्देया व्हिडिओत चक्क मलायका मुंबईच्या रसत्यांवर धावताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत मलायका वांद्रेतील रस्त्यावरून धावत आहे.
अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या फिटनेस आणि ग्लॅमरस अदांमुळे बऱ्याचदा चर्चेत असते. बऱ्याचदा तिचे स्टायलिश फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ४७ वर्षीय मलायका अरोरा नेहमी इव्हेंट्स किंवा एअरपोर्टवरील वेगवेगळ्या लूकमधील फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असते. इतकेच नाही तर मलायका आपल्या फिटनेस आणि अर्जुनसोबतच्या रिलेशनशीपमुळेही बऱ्याचदा चर्चेत असते. यादरम्यान मलायकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओत चक्क मलायका मुंबईच्या रसत्यांवर धावताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत मलायका वांद्रेतील रस्त्यावरून धावत आहे. तिने शॉर्टस आणि टी-शर्ट घातला आहे. पण तिला ओळखणे देखील कठीण जात आहे. तिच्या बाजूने जाणाऱ्या लोकांनादेखील ती मलायका असल्याचे कळले नसल्याचे दिसून येत आहे.
मलायका अरोरा बऱ्याचदा अर्जुन कपूरसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत येत असते. मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा २०१७ साली घटस्फोट झाला होता. मात्र मलायका २०१६ पासून वेगळी रहायला लागली होती. दोघांना एक मुलगा आहे. त्यांचा मुलगा अरहान खानची कस्टडी मलायकाला मिळाली आहे. मलायका आणि अरबाज वेगळे झाल्यानंतर मलायका आणि अर्जुन यांच्यातील जवळीक वाढू लागल्याच्या चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्या होत्या. एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अर्जुनने मलायकासोबत लग्नाच्या चर्चांवर सांगितले होते की, मला आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाला देखील माहित आहे की, मी मॅच्युअर असल्याने जे करेन ते योग्य करेन.