या एका चुकीने संपले मलायकाची बहीण अमृता अरोरोचे फिल्मी करिअर! आईवडिलही झाले होते नाराज!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2020 08:00 IST2020-07-26T08:00:00+5:302020-07-26T08:00:02+5:30

काही चित्रपटांत काम केल्यानंतर अमृता अचानक बॉलिवूडमधून गायब झाली. आता केवळ बॉलिवूडच्या पार्ट्यांना ती दिसते तेवढीच.

malaika arora sister amrita arora had made a big mistake in the middle of her career | या एका चुकीने संपले मलायकाची बहीण अमृता अरोरोचे फिल्मी करिअर! आईवडिलही झाले होते नाराज!!

या एका चुकीने संपले मलायकाची बहीण अमृता अरोरोचे फिल्मी करिअर! आईवडिलही झाले होते नाराज!!

ठळक मुद्देआवारा पागल दीवाना, एक और एक ग्यारह असे अनेक सिनेमे तिने केलेत. या सिनेमाने अमृताला फार काही यश दिले नाही.

मलायका अरोरा आणि तिची बहीण अमृता अरोरा इंडस्ट्रीत त्यांच्या स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखल्या जातात. मलायका अ‍ॅक्टिंगच्या दुनियेत फार काही करू शकली नाही. पण किमान टीव्ही रिअ‍ॅलिटी शोमध्ये जज बनून मिरवण्याइतके नाव तिने नक्कीच कमावले आहे. मात्र अमृताचे काय? काही चित्रपटांत काम केल्यानंतर अमृता अचानक बॉलिवूडमधून गायब झाली. आता केवळ बॉलिवूडच्या पार्ट्यांना ती दिसते तेवढीच.


अमृताने ‘कितने दूर कितने पास’ या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता. यात अमृतासोबत फरदीन खान लीड रोलमध्ये होता. असे म्हणतात की, या चित्रपटादरम्यान अमृता व फरदीन एकमेकांच्या नको इतके जवळ आले होते. मात्र फरदीन आधीच रिलेशनशिपमध्ये होता. यादरम्यानचा एक किस्सा आजही बॉलिवूडमध्ये ऐकवला जातो. 

एका पार्टीत अमृता गेली होती. फरदीनही त्याच्या गर्लफ्रेन्डसोबत या पार्टीला आला. या पार्टीत फरदीनची गर्लफ्रेन्ड व अमृता यांच्यात चांगलाच वाद झाला होता. इतकेच नाही तर फरदीनच्या गर्लफ्रेन्डने म्हणे अमृताच्या थोबाडीतही हाणली होती.
अमृताच्या करिअरबद्दल सांगायचे तर आवारा पागल दीवाना, एक और एक ग्यारह असे अनेक सिनेमे तिने केलेत. या सिनेमाने अमृताला फार काही यश दिले नाही. मात्र अजय देवगणच्या जमीन या सिनेमात ‘दिल्ली की सर्दी’ हे आयटम सॉन्ग तिने केले आणि अचानक ती चर्चेत आली. या गाण्यातील अमृताचा बोल्ड अवतार पाहून भल्याभल्यांना घाम फुटला होता. या गाण्याने अमृताला नवी ओळख दिली. यानंतर सगळे काही ठीक सुरु असतानाच अचानक अमृताने एक चूक केली आणि तीच चूक तिला नडली.

होय, अमृताने ‘गर्लफ्रेन्ड’ हा सिनेमा साईन केला. हीच तिची चूक ठरली. या सिनेमात अमृताने ईशा कोप्पीकरसोबत अतिशय बोल्ड सीन्स दिलेत. मात्र दोन मैत्रिणींच्या नात्यावर आधारित हा सिनेमा लोकांच्या पचनी पडला नाही.
‘गर्लफ्रेन्ड’च्या स्क्रिनिंगला अमृता तिच्या आईवडिलांना घेऊन गेली होती. पण चित्रपट इतका बोल्ड होता की, तिचे आईवडील पूर्ण सिनेमा न पाहताच घरी परतले होते. एकप्रकारे कुटुंबालाही तिचा हा बोल्ड अवतार आवडला नव्हता. एकंदर काय तर ‘गर्लफ्रेन्ड’  अमृताचे करिअर घेऊन बुडाला.
पुढे अमृताला सलमान खानने आधार दिला. मुझसे शादी करोगी या सिनेमात तिला कॅमिओची संधी दिली. यानंतर सोहेल खानच्या फाईट क्लब सिनेमात अमृता झळकली. मात्र याचा काहीहीफायदाझालानाही.

Web Title: malaika arora sister amrita arora had made a big mistake in the middle of her career