कोरोनापासून वाचण्यासाठी मलायकाकडे आहे रामबाण उपाय, विश्वास नाही बसत एकदा पाहाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 18:01 IST2020-05-28T18:00:42+5:302020-05-28T18:01:12+5:30
कोरोनाचे संक्रमण आटोक्यात आणायचे असेल तर मलायकाच्या टीप्स ठरू शकतात फायदेशीर.

कोरोनापासून वाचण्यासाठी मलायकाकडे आहे रामबाण उपाय, विश्वास नाही बसत एकदा पाहाच
छैय्या छैय्या गर्ल मलायका अरोरा नेहमीच तिच्या वर्कआऊट व्हिडीओ आणि फोटोमुळे इतरांना प्रेरणा देत असते. ती फिटनेस फ्रिक आहे हे जगजाहीर आहे. तिचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. मलायका ही चोखदंड आहे. ती जे काही करते त्यात काही ना काही खासियत असतेच. तिचा व्हायरल झालेल्या व्हिडीओत याची प्रचिती येईल.
आता चक्क कोरोनापासून स्वतःला दूर कसे ठेवावे, कोरोनाचे संक्रमण आटोक्यात आणायचे असेल तर मलायकाच्या टीप्स ठरू शकतात फायदेशीर. सध्या घरातच बंदिस्त असल्यामुळे स्वतःला बिझी ठेवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करताना ती दिसते. कधी कुकिंग करताना तर कधी घराची साफसफाई करताना तर आपले नेहमीचे वर्कआऊट करत ती इतरांनाही प्रेरणा देत असते. शेअर केलेल्या व्हिडीओत उन्हात उभी राहून व्हिटॅमिन डी घेते. सकाळी उन्हात उभं राहणं खुप फायदेशीर आहे असेही तिने सांगितले आहे.
45 वर्षांच्या वयातही स्वत:ला खूप चांगले फिट ठेवले आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा बिकिनी अवतार तिने शेअर केला होता तिचा हा बोल्ड अंदाज चाहत्यांना कमालीचा आवडला असून काहीच तासांत या फोटोंना हजारो लाईक्स मिळाले होते.
वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही मलायकाचे फिटनेस प्रेम पाहून भल्या भल्यांची बोलती बंद नाही झाली तरच नवल. तिचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत असून यावर खूप सारे कमेंटस आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.