वयाच्या ४६ व्या वर्षातही बॉलिवूडची ही अभिनेत्री भल्याभल्यांना देते टक्कर, पहा तिचे बोल्ड व सेक्सी फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 17:43 IST2020-02-15T17:43:31+5:302020-02-15T17:43:56+5:30

मलायका अरोराचे जुने सेक्सी फोटो सोशल मीडियावर होतायेत व्हायरल

Malaika Arora Shared old black and white photos, looking so sexy and hot | वयाच्या ४६ व्या वर्षातही बॉलिवूडची ही अभिनेत्री भल्याभल्यांना देते टक्कर, पहा तिचे बोल्ड व सेक्सी फोटो

वयाच्या ४६ व्या वर्षातही बॉलिवूडची ही अभिनेत्री भल्याभल्यांना देते टक्कर, पहा तिचे बोल्ड व सेक्सी फोटो

अभिनेत्री मलायका अरोरा व अर्जुन कपूर याची लव्हस्टोरी आता कुणापासूनही लपून राहिलेली नाही. एकेकाळी चोरून लपून भेटणारे हे कपल आता खुल्लमखुल्ला फिरताना दिसतात. हे दोघं रिलेशनशीपमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात. याशिवाय मलायका सोशल मीडियावर सक्रीय असून ती फोटो शेअर करत असते. तिच्या फोटोंवर खूप लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. मलायकचे हॉट फोटो, व्हिडिओ, लूक सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात.

नुकतेच मलायका अरोराने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत आणि हे फोटो व्हायरल होण्याचं कारण काही वेगळं आहे. मलायकाने शेअर केलेले हे सगळे फोटो ब्लॅक अँड व्हाइट मध्ये आहेत. मलाकाने फोटो शेअर करताना '#blacknwhiteseries' असं लिहिलं आहे. या फोटोंकडे बघितल्यावर कळतं की हे फोटो काही वर्षापूर्वीचे आहेत. मात्र तरिही या फोटोंमधील मलायकाचा हॉट अंदाज चाहत्यांना भावतो आहे. चाहते दिलखुलासपणे मलायकाच्या फोटोवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.


अर्जुन कपूर व मलायका एकमेकांना बऱ्याच कालावधीपासून डेट करत आहेत. असं बोललं जातंय की ते दोघं लवकरच लग्न करू शकतात. अरबाज खान सोबत विभक्त झाल्यानंतर मलायका व अर्जुन एकमेकांना डेट करत असल्याचे वृत्त समोर आले होते.


बराच काळ त्या दोघांनी चुप्पी साधली होती. मात्र या वर्षाच्या सुरूवातीला दोघांनी ते रिलेशनशीपमध्ये असल्याचे जगजाहीर केले.


वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर अर्जुन कपूर लवकरच रकुल प्रीतसोबत एका चित्रपटात दिसणार आहे. मलायका रुपेरी पडद्यापासून दूर असली तर टेलिव्हिजनवरील काही शोजमध्ये दिसते.

Web Title: Malaika Arora Shared old black and white photos, looking so sexy and hot