Hotness overloaded : वयाच्या 45 व्या वर्षीही ही अभिनेत्री हॉटनेसमध्ये देते भलभल्यांना टक्कर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 11:24 IST2019-08-03T11:20:19+5:302019-08-03T11:24:56+5:30
ही अभिनेत्री हॉट अदा आणि फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ फॅन्सासाठी नेहमीच शेअर करत असते

Hotness overloaded : वयाच्या 45 व्या वर्षीही ही अभिनेत्री हॉटनेसमध्ये देते भलभल्यांना टक्कर
ही अभिनेत्री हॉट अदा आणि फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ फॅन्सासाठी नेहमीच शेअर करत असते. तिचे फॅन्सदेखील तिच्या फोटोंवर फिदा असतात. 45च्या वर्षांच्या वयातही स्वत:ला खूप चांगले फिट ठेवले आहे.
जिम वेअरमधील तिचे फोटो त्यामुळेच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तुम्हाला अंदाज आला असेलच आम्ही कोणा बद्दल बोलतोय ते. आम्ही बोलतोय ते, मलायक अरोराबाबत. मलायका तिच्या वैयक्तिक आयुष्याला घेऊन ही सतत चर्चेत असते. अर्जुन कपूरसोबतच्या अफेअरमुळे ती सतत चर्चेत असते.
दीर्घकाळापासून मलायका अर्जुन कपूरसोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. गत ६ जुनला अर्जुनचा वाढदिवस होता. अर्जुनला बर्थ डे विश करताना, मलायकाने त्याच्यासोबतचे रोमॅन्टिक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. शिवाय आपले नाते जगजाहिर केले होते.
सुरुवातीला मलायका व अर्जुन दोघांनीही आपले नाते जगापासून लपवून ठेवले. पण अरबाजसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अगदी बिनधास्त अर्जुनसोबत फिरू लागली.
नुकतीच दोघांनी आपल्या प्रेमाची आणि नात्याची कबुली दिलीय. अलीकडे अर्जुन कपूर मलायकाच्या आई-वडिलांना भेटायला त्यांच्या घरी गेला होता. त्यांचे फोटो सोशल मीडियावर समोर आले होते.
मलायकाचे वडील अनिल अरोरा सुद्धा या फोटोंमध्ये दिसले होते. या भेटीनंतर मलायका आणि अर्जुनच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे.