मलायका अरोराचा ‘बॉसी’ लूक पाहून व्हाल थक्क, व्हायरल झालेत फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2020 16:19 IST2020-02-09T16:04:13+5:302020-02-09T16:19:19+5:30

बॉस लेडी...

malaika arora in sequined powersuit boss lady look for new shoot | मलायका अरोराचा ‘बॉसी’ लूक पाहून व्हाल थक्क, व्हायरल झालेत फोटो

मलायका अरोराचा ‘बॉसी’ लूक पाहून व्हाल थक्क, व्हायरल झालेत फोटो

ठळक मुद्देमलायका सध्या अर्जुन कपूरला डेट करतेय.

मलायका अरोराचे फोटोशूट म्हटले की, फोटो व्हायरल होणारच.  होय, मलायकाचे सेक्सी, हॉट व्हिडीओ पाहून चाहते घायाळ होतात. क्षणात तिचे फोटो व्हायरल होतात. मलायकाचे ताजे फोटोशूटही असेच. मलायकाने हे फोटो शेअर केलेत आणि क्षणात ते व्हायरल झालेत. मलायकाचे हे फोटो पाहिल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा थक्क व्हाल, मलायका 46 वर्षांची असून एका मुलाची आई आहे, हे सांगूनही पटणार नाही.

या फोटोंमध्ये मलायकाने पर्पल शिमरी पावरसूट परिधान केला आहे. सोबत लॉन्ग इअररिंग, मोकळे केस असा तिचा लूक आहे. या नव्या फोटोशूटमध्ये मलायकाचा सुपरहॉट अंदाज पाहण्यासारखा आहे.

या नव्या बॉसी लूकमध्ये तिने एकापेक्षा एक स्टनिंग पोज दिल्या आहेत.  सध्या तिचे हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

चाहत्यांनी मलायकाच्या या फोटोंवर एकापेक्षा एक भारी कमेंट्स दिल्या आहेत. सुपर कुल, सुपर बोल्ड, हॉट अशा शब्दांत अनेकांनी मलायकाच्या या फोटोंचे कौतुक केले आहे.  


तूर्तास मलायका ‘सुपरमॉडल आॅफ द इअर’ हा शो जज करतेय. मलायकाने याआधी ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या रिअ‍ॅलिटी शोची जज होती. नज बलिये,  जरा नचके दिया, झलक दिखला जा यासारखे अनेक रिअ‍ॅॅलिटी शो जज करताना ती दिसली आहे.

 मलायका सध्या अर्जुन कपूरला डेट करतेय. अर्जुन मलायकापेक्षा 11 वर्षांनी लहान आहे. यावरून मलायका अनेकदा ट्रोलही झाली. पण मलायकाने या ट्रोलिंगची कधीच पर्वा केली नाही. सध्या ती आपल्या जगात आनंदी आहे. लवकरच हे कपल लग्न करणार असे मानले जात आहे. 

Web Title: malaika arora in sequined powersuit boss lady look for new shoot