लॉकडाउनमध्ये अर्जुन कपूरला नाही तर या व्यक्तीला मिस करतेय मलायका अरोरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 12:11 IST2020-05-06T12:11:23+5:302020-05-06T12:11:56+5:30

लॉकडाउनमध्ये मलायका या व्यक्तीला खूप मिस करते आहे.

Malaika Arora is missing this person, not Arjun Kapoor in the lockdown TJL | लॉकडाउनमध्ये अर्जुन कपूरला नाही तर या व्यक्तीला मिस करतेय मलायका अरोरा

लॉकडाउनमध्ये अर्जुन कपूरला नाही तर या व्यक्तीला मिस करतेय मलायका अरोरा

बॉलिवूडची अभिनेत्री मलायका अरोरा अर्जुन कपूरसोबत असलेल्या अफेयरमुळे खूप चर्चेत असते. तसेच ती तिच्या बोल्ड व हॉट फोटोशूटमुळेही बऱ्याचदा सोशल मीडियावर चर्चेत येते. लॉकडाउनमध्ये मलायका आपल्या जवळच्या व्यक्तींना खूप मिस करते आहे. त्यामुळे ती सध्या तिच्या जवळच्या व्यक्तींचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करताना दिसते.

नुकताच तिने एक फोटो शेअर करत लिहिले की, पन्नास दिवस आणि दिवस मोजतेय मिस यू. या फोटोत तिचे वडील, आई व बहिण पहायला मिळते आहे.



यापूर्वी तिने तिच्या मुलासोबतचा जुना फोटो शेअर केला होता आणि लिहिले की, एक वेळ होता जेव्हा सर्व काही सामान्य होते. मात्र आता सर्व काही सीमित आहे खाणे, फिरणे, मिठी मारणे, काम करणे, मित्र व परिवार सर्व काही.


 मलायका अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे खूप चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी एका लाइव्ह चॅटमध्ये अर्जुनला मलायकाशी लग्न करण्याच्या प्लानविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना, जर लग्न केलं तर आम्ही दोघंही कोणापासून लपवणार नाही.

मात्र सध्या तरी लग्नाचा कोणताही विचार आम्ही केलेला नाही. सध्या आम्ही दोघंही आमच्या कामावर लक्ष देत आहोत असं अर्जुन म्हणाला होता.

Web Title: Malaika Arora is missing this person, not Arjun Kapoor in the lockdown TJL