सलमान खानचं नाव ऐकताच भडकली मलायका अरोरा, म्हणाली - 'त्याने मला...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 11:07 IST2023-01-28T11:07:14+5:302023-01-28T11:07:39+5:30
Malaika Arora: मलायका अरोराचे नाते भलेही सलमान खानचा भाऊ अरबाज खानसोबत असेल, पण तिने स्वत:च्या बळावर इंडस्ट्रीत वेगळी छाप पाडली आहे.

सलमान खानचं नाव ऐकताच भडकली मलायका अरोरा, म्हणाली - 'त्याने मला...'
मलायका अरोरा (Malaika Arora) आजही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मलायका अरोराचे पहिले लग्न सलमान खान(Salman Khan)चा भाऊ अरबाज खान(Arbaaz Khan)सोबत झाले होते. अरबाज खान आणि मलायका अरोरा हे बॉलिवूडमधील पॉवर कपल्सपैकी एक होते पण काही कारणांमुळे दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतरही मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचे नाते अरबाज खान आणि त्याच्या कुटुंबाशी एक ना एक प्रकारे जोडलेले राहिले.
मलायका अरोराबाबत, इंडस्ट्रीमध्ये लोक अनेकदा म्हणायचे की मलायकाचे करिअर घडवण्यामागे सलमान खानचा हात आहे. यावर संतापलेल्या मलायकाने जोरदार प्रत्युत्तर दिले. खरं तर, ड्रामा क्वीन राखी सावंतने मलायका अरोराची खिल्ली उडवली आणि म्हटले की, सलमान खानच्या कुटुंबातील असल्याने मलायका अरोराला आयटम गर्लचा टॅग कधीच लागला नाही.
मलायका अरोराबद्दल बोलताना राखी सावंत म्हणाली होती की, खान कुटुंबाशी असलेल्या नात्यामुळे तिला इंडस्ट्रीत अनेक संधी मिळाल्या आहेत. राखी सावंतचा व्हिडिओ पाहिल्यानंतर मलायकाचा राग अनावर झाला आणि म्हणाली, असे झाले असते तर मी सलमान खानच्या प्रत्येक चित्रपटात एक आयटम साँग करायला हवे होते. मलायका म्हणाली, 'मी सेल्फ मेड आहे आणि सलमान खानने मला बनवले नाही...'