मलायका अरोराने जिममध्ये दाखवले सेक्सी डान्स मुव्ह्ज, पाहून भल्याभल्यांची झाली बोलती बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 17:00 IST2021-03-19T16:40:18+5:302021-03-19T17:00:13+5:30
मलायकाचा बॉयफ्रेंज अर्जुन कपूरला ही तिचा हा डान्सचा व्हिडिओ आवडला आहे.

मलायका अरोराने जिममध्ये दाखवले सेक्सी डान्स मुव्ह्ज, पाहून भल्याभल्यांची झाली बोलती बंद
अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या फिटनेस आणि ग्लॅमरस अदांमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असते. बऱ्याचदा तिचे स्टायलिश फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ४७ वर्षीय मलायका अरोरा नेहमी इव्हेंट्स किंवा एअरपोर्टवरील वेगवेगळ्या लूकमधील फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असते. इतकेच नाही तर मलायका आपल्या फिटनेस आणि अर्जुनसोबतच्या रिलेशनशीपमुळेही बऱ्याचदा चर्चेत येत असते. यादरम्यान मलायकाचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मलायका अरोराने जिममधून एक मस्त डान्स व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती किलर मुव्हज देताना दिसते आहे. जिममधील या व्हिडिओला 1 तासाच्या आत 6 लाखाहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. मलायकाचा बॉयफ्रेंज अर्जुन कपूरला ही तिचा हा डान्सचा व्हिडिओ आवडला आहे.
मलायका या व्हिडिओत जबरदस्त डान्स मुव्ह्ज करताना दिसत आहे. मलायकाच्या या डान्सवर चाहतेच नव्हे तर इंडस्ट्रीतील तिचे फ्रेंड्सदेखील जोरदार कमेंट्स करीत आहे. या व्हिडिओमध्ये मलायका जेसन डेरुलोचे लोकप्रिय गाणे विगल विग्लवर नाचताना दिसते आहे.
'गिल्टी' फेम आकांक्षा रंजन कपूरने मलायकाच्या या व्हिडिओवर प्रश्न केला आहे की तुला यामुळे उशीर झाला आहे का? ज्यावर मलायकाने हसणारी इमोजी पोस्ट केली आहे. अर्जुन रॅपलची गर्लफ्रेंड गॅब्रिएला हिने या व्हिडिओवर कमेंट केली आहे.