Love In Air ! मलायका प्रेमाने अर्जुन कपूरला या क्युट नावाने देते आवाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 16:00 IST2019-07-04T15:57:32+5:302019-07-04T16:00:37+5:30
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर सध्या बी-टाऊनमधले सगळ्यात हॉट कपल आहे.

Love In Air ! मलायका प्रेमाने अर्जुन कपूरला या क्युट नावाने देते आवाज
ठळक मुद्देमलायकाने एका फोटो शेअर केला आहे
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर सध्या बी-टाऊनमधले सगळ्यात हॉट कपल आहे. अर्जुन कपूरच्या वाढदिवसानिमित्त दोघांनीही सुट्टीचा प्लान बनवला होता आणि दोघेही न्यूयॉर्कला रवाना झाले. मलायकाने यादरम्यान अर्जुनवरील आपल्या प्रेमाची जाहिर कबुली दिली. पाठोपाठ अर्जुननेही जाहिरपणे आपले प्रेम व्यक्त केले. आता मलायकाने एका फोटो शेअर केला आहे आणि या फोटोत तिने अर्जुनला कोणत्या नावाने बोलवते याचा खुसाला केला आहे.
अर्जुन आणि मलायकाने या फोटोत एकाच कॅप घातलेली आहे. मलायकाने या फोटोला कॅप्शन दिले आहे की, 'Mad hatter in nyc (p.s THE mad hatter clicked it)'. याचा अर्थ मलायका अर्जुनला मॅड हॅटर नावाने बोलवते.
मलायका आणि अर्जुनने प्रेमाची जाहिरपणे कबुली दिल्यानंतर आता कपूर कुटुंबात लवकरच सनई चौघडे वाजणार, असे तुम्हाला वाटत असेल तर असे नाही. कारण, सध्या माझा लग्नाचा कुठलाही विचार नाही. माझी पर्सनल व प्रोफेशनल लाईफ चांगली सुरु आहे. आयुष्यात मी स्थिरावलो, असे मला वाटतेय. मी माझे खासगी आयुष्य कधीच लपवले नाही. त्यामुळे लग्नाचा बेत असेल तर तेही मी जगापासून लपवणार नाही, असे अर्जुन अलीकडे एका मुलाखतीत म्हणाला होता. एकंदर काय तर ‘दोनों तरफ लगी है आग बराबर...’ असेच अर्जुन व मलायकाबद्दल म्हणता येईल.