Malaika Arora : ‘तू जवळ असतोस तेव्हा..’, स्कॉटलँडमध्ये अर्जुन – मलायकाचा रोमान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 15:42 IST2023-04-19T15:39:48+5:302023-04-19T15:42:09+5:30
Malaika-Arjun Vacation : मलायकाने स्कॉटलँडमधील अर्जुन कपूरसोबतचे काही राेमॅन्टिक फोटो शेअर केले आहेत...

Malaika Arora : ‘तू जवळ असतोस तेव्हा..’, स्कॉटलँडमध्ये अर्जुन – मलायकाचा रोमान्स
Malaika Arora-Arjun Kapoor: बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा सध्या कुठे आहेत तर दूर युरोपात व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत. आता मलायकाने स्कॉटलँडमधील अर्जुन कपूरसोबतचे काही राेमॅन्टिक फोटो शेअर केले आहेत. फोटोत दोघेही फुल विंटर ड्रेसमध्ये दिसत आहेत. अर्जुन कपूरने ब्लेझर घातला असून विंटर कॅप घातली आहे. मलायका अरोरा हिने जॅकेट घातले आहे आणि तिने देखील कॅप घातली आहे. दोघंही सेल्फीसाठी मस्तपैकी पोज देत आहेत. 'उबदार आणि आरामदायक. तू जवळ असतोस तेव्हा...' असं कॅप्शन देत मलायकाने तीन फोटो शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये तिने बॉयफ्रेंड अर्जुन कपूरला टॅग केलं आहे.
मलायका आणि अरोरा यांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या फोटोंवर चाहत्यांकडून आणि इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींकडून लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
मलायका आणि अर्जुन गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांच्या वयात 12 वर्षांचं अंतर असल्याने अनेकदा त्यांना ट्रोल करण्यात आलं. मात्र या ट्रोलिंगला न जुमानता दोघांनी जाहीरपणे एकमेकांविषयी प्रेम व्यक्त केलं.
२०१९ मध्ये मलायका व अर्जुनने आपल्या नात्याची कबुली दिली होती. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या लग्नाबाबत चर्चांना उधाण आलंय. हे कपल लवकरच लग्न करणार असल्याचं मानलं जात आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मलायका लग्नाबद्दल बोलली होती. “मी लग्नाबद्दल नक्कीच विचार केला आहे. मी पुन्हा लग्न करणार नाही, असं लोकांना वाटत असेल तर ते खरं नाहीये. मला लग्नसंस्थेवर पूर्ण विश्वास आहे. तितकाच माझा प्रेमावरही विश्वास आहे. अर्थात मी लग्नाचा निर्णय कधी घेईल, याबद्दल आत्तातरी मी काहीही सांगू शकत नाही. माझ्यामते, काही गोष्टी सरप्राईज राहिलेल्याच चांगल्या असतात आणि तसंही मी फार प्लॅनिंग करत नाही. मला सतत प्लॅनिंग करायलाही आवडत नाही”, असं ती म्हणाली होती.