नातं जगजाहीर असताना ही बॉलिवूडचे हे हॉट कपल चेहरा लपवण्याचा का करतायेत प्रयत्न?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 14:29 IST2019-07-03T14:29:22+5:302019-07-03T14:29:29+5:30
सध्या न्यूयॉर्कमध्ये हे दोघे व्हॅकेशन एन्जॉय करतायेत. दोघांनी न्यूयॉर्कमधले रोमाँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

नातं जगजाहीर असताना ही बॉलिवूडचे हे हॉट कपल चेहरा लपवण्याचा का करतायेत प्रयत्न?
सध्या न्यूयॉर्कमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतायेत. दोघांनी न्यूयॉर्कमधले रोमाँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तुम्हाला कळलेच असेल आम्ही कोणाबाबत बोलतोय ते. अर्जुन कपूरच्या वाढदिवसानिमित्त दोघांनीही सुट्टीचा प्लान बनवला आणि मलायका आणि अर्जुन न्यूयॉर्कला रवाना झाले होते. दोघे ही आपलं प्रेम जगजाहिर करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मात्र मलायकाने तिच्या इन्स्टाग्रामवरील स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. यात त्या दोघांनी चेहऱ्याला मास्क लावलेला दिसतोय.
या फोटोत मलायका आणि अर्जुनने चेहऱ्यावर सिल्वर कलरचा मास्क लावला आहे. या फोटोला तिने राईट लव्हर्स कॅप्शन देखील दिले आहे. या फोटोत तिने अर्जुन कपूरला टॅगदेखील केले आहे.
मलायका आणि अर्जुनने प्रेमाची जाहिरपणे कबुली दिल्यानंतर आता कपूर कुटुंबात लवकरच सनई चौघडे वाजणार, असे तुम्हाला वाटत असेल तर असे नाही. कारण, सध्या माझा लग्नाचा कुठलाही विचार नाही. माझी पर्सनल व प्रोफेशनल लाईफ चांगली सुरु आहे. आयुष्यात मी स्थिरावलो, असे मला वाटतेय. मी माझे खासगी आयुष्य कधीच लपवले नाही. त्यामुळे लग्नाचा बेत असेल तर तेही मी जगापासून लपवणार नाही, असे अर्जुन अलीकडे एका मुलाखतीत म्हणाला होता. एकंदर काय तर ‘दोनों तरफ लगी है आग बराबर...’ असेच अर्जुन व मलायकाबद्दल म्हणता येईल.