हाय गरमी! वीकेंडआधीच मलायकाच्या बोल्ड फोटोमुळे वातावरण तापलं, बिकनी फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 17:51 IST2021-12-03T17:50:48+5:302021-12-03T17:51:48+5:30
Malaika Arora : मलायकाच्या व्हायरल झालेल्या या फोटोत ती बिकीनीमध्ये दिसत आहे. तिने यात तिची शानदार फिगर फ्लॉन्ट केली आहे. यावेळी तिच्या गळ्यातील चमकदार नेकलेसही सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

हाय गरमी! वीकेंडआधीच मलायकाच्या बोल्ड फोटोमुळे वातावरण तापलं, बिकनी फोटो व्हायरल
मलायका अरोरा (Malaika Arora) सध्या बॉयफ्रेन्ड अर्जुन कपूर (Arjun Kapoor) सोबत मालदीव वेकेशन एन्जॉय करत आहे. अर्जुन काही दिवसांपासून या व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे. जे व्हायरल झाले आहेत. फोटोंमध्ये मलाइका फारच बोल्ड अंदाजात दिसत आहे. तिचा एक फोटो तर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मलायकाच्या व्हायरल झालेल्या या फोटोत ती बिकीनीमध्ये दिसत आहे. तिने यात तिची शानदार फिगर फ्लॉन्ट केली आहे. यावेळी तिच्या गळ्यातील चमकदार नेकलेसही सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या नेकलेमुळे तिचा लूक कम्प्लीट झाला असं म्हणायला हरकत नाही. मलायकाचा हा बोल्ड अंदाज तिच्या फॅन्सनाही खूप आवडला. हा फोटो मलायकाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केलाय.
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर दोघेही त्यांच्या नात्याबाबत काही बोलताना दिसत नाही. पण ते दोघेही एकमेकांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एकत्र फोटो शेअर करतात. अनेक ठिकाणी ते दोघे एकत्र बघायला मिळतात. अनेक पार्टीज किंवा इव्हेंटमध्ये ते सोबत असतात. दिवाळीलाही ते एकत्र दिसले होते.
वर्कफ्रॅन्टबाबत सांगायचं तर अर्जुन कपूर 'भूत पोलीस' सिनेमात दिसला होता. सिनेमात त्याने सैफ अली खान, यामी गौतम, जॅकलिन फर्नांडिससोबत काम केलं होतं. ही हॉरर-कॉमेडी काही लोकांना आवडली होती. आता अर्जुन 'एक व्हिलन २'मध्ये बिझी आहे. या सिनेमात तो जॉन अब्राहम, तारा सुतारिया आणि दिशा पटनीसोबत काम करताना दिसणार आहे. तर मलायका इंडियाज बेस्ट डान्सरची जज आहे.