​मलायका -अरबाज यांनी लावली फॅमिली कोर्टात हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2016 21:41 IST2016-11-29T21:41:44+5:302016-11-29T21:41:44+5:30

बॉलिवूडमधील हॉट कपल म्हणून ख्यात असलेले मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी मागील आठवड्यात घटस्फोटासाठी अर्ज दिला असल्याचे सांगण्यात ...

Malaika-Arbaaz arrives in Lovely Family Court | ​मलायका -अरबाज यांनी लावली फॅमिली कोर्टात हजेरी

​मलायका -अरबाज यांनी लावली फॅमिली कोर्टात हजेरी

ong>बॉलिवूडमधील हॉट कपल म्हणून ख्यात असलेले मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी मागील आठवड्यात घटस्फोटासाठी अर्ज दिला असल्याचे सांगण्यात आले होते. मंगळवारी दोघेही मुंबईच्या फॅमिली कोर्टात दिसल्याने यावर दोघांच्या घटस्फोटोच्या बातमीवर शिक्कामोर्तबच झाले आहे. 

मलायका व अरबाज खान यांनी मार्च महिन्यात एका निवेदनाच्या माध्यमातून दोघेही वेगळे होणार असल्याची माहिती दिली होती. यानंतर दोघेही वेगळे राहायला लागले. दरम्यान दोघांच्या कुटुंबियांनी मध्यस्थी करून त्यांची समजूत घातल्याची चर्चा होती. त्यांनी नात्याला आणखी एक संधी द्यावी असे दोघांच्या नातलगांना वाटत होते. मात्र दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. 

Malaika and Arbaaz spotted at a family court :

कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज सादर केल्यावर त्यावर दोघांची संमती असून महत्त्वाचे असते. या शिवाय दोघांना कोर्टाकडून समुपदेशन देखील केले जाते. यासाठीच दोघांनी मुंबईच्या बांद्रा येथील फॅमिली कोर्टात हजेरी लावली होती. मुंबईत सेलिब्रेटींचे फोटो घेण्यासाठी असलेल्या पॅपराझींनी दोघांचे न्यायालयातील फोटो काढले. दोघांचे फोटो पाहून त्यांनी एकमेकांकडे पाहिले देखील नाही असे दिसते. दोघेही कोर्टाबाहेर येताना मलायका आधी आली, मागून अरबाज आला. दोघांनी काही न बोलता आपआपल्या कारने प्रस्थान केले. मात्र कारमध्ये बसताना एकदा अरबाजने मलायकाकडे पाहिले. 

Malaika and Arbaaz spotted at a family court :

‘आमच्या नात्याचे भविष्य काय असेल याचा विचार करण्यासाठी आम्ही काही काळ वेगळे होणार आहोत,’ असे मलायका व अरबाज यांनी जाहीर निवेदनातून साांगितले होते. मधल्या काळात दोघेही अनेक कार्यक्रमांत एकत्र दिसले. त्यामुळे सर्व काही ठीक झाल्याचे वाटत होते. दोघांच्या नात्याबाबत मीडियाने चर्चा करू नये असे मलायकाला वाटत होते. मात्र आता दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. 

Web Title: Malaika-Arbaaz arrives in Lovely Family Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.