'ही' बॉलिवूड अभिनेत्री होणार भाग्यश्रीची सून; अभिमन्यू करतोय 'स्कॅम 1992'फेम अभिनेत्रीला डेट?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 02:29 PM2023-07-04T14:29:38+5:302023-07-04T14:30:30+5:30

Abhimanyu dasani: एका सिनेमाच्या सेटवर त्यांची भेट झाली आणि तेव्हाच ते प्रेमात पडल्याचं सांगण्यात येतं.

maine pyar kiya fame bhagyashree son abhimanyu dasani dating bollywood actress | 'ही' बॉलिवूड अभिनेत्री होणार भाग्यश्रीची सून; अभिमन्यू करतोय 'स्कॅम 1992'फेम अभिनेत्रीला डेट?

'ही' बॉलिवूड अभिनेत्री होणार भाग्यश्रीची सून; अभिमन्यू करतोय 'स्कॅम 1992'फेम अभिनेत्रीला डेट?

googlenewsNext

 पहिल्याच सिनेमातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री (bhagyashree). 'मैंने प्यार किया' (maine pyar kiya) या सिनेमातूनभाग्यश्रीने कलाविश्वात पदार्पण केलं. विशेष म्हणजे या सिनेमामुळे ती रातोरात सुपरस्टार झाली. या सिनेमानंतर भाग्यश्री फार मोजक्या सिनेमांमध्ये झळकली. मात्र, आजही तिची लोकप्रियता कायम आहे. सोशल मीडियावर कायम तिच्या प्रोफेशनल लाइफसह वैयक्तिक जीवनाची चर्चा रंगत असते. मात्र,यावेळी तिच्या लेकाची अभिनेता अभिमन्यू दसानी (abhimanyu dasani) याची चर्चा रंगली आहे. अभिमन्यू एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला डेट करत असल्याचं म्हटलं जातं आहे.

भाग्यश्रीप्रमाणेच तिच्या लेकाने अभिमन्यूने कलाविश्वात पदार्पण केलं आहे. त्यामुळे बऱ्याचदा त्याच्या सिनेमांची नेटकऱ्यांमध्ये चर्चा होत असते. परंतु, यावेळी तो त्याच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत आहे. अभिमन्यू एका अभिनेत्रीला डेट करत असून त्यांची लव्हस्टोरी सध्या चर्चेत आहे.

अभिमन्यू 'द फॅमेली मॅन' या  वेब सीरिजमध्ये झळकलेल्या अभिनेत्री श्रेया धन्वंतरी हिला डेट करत आहे. विशेष म्हणजे ही जोडी लवकरच नौसिखिये या सिनेमामध्ये एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. आणि, याच सिनेमाच्या सेटवर त्यांचं सूत जुळलं. भोपाळमध्ये जवळपास एक महिना नौसिखियेचं चित्रीकरण सुरु होतं. याच काळात दोघांची मैत्री झाली आणि त्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. त्यामुळे सध्या ही जोडी एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान, 'लस्ट स्टोरीज २'च्या स्क्रिनिंगच्या वेळी या दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. परंतु, अद्यापही या दोघांनी जाहीरपणे एकमेकांसोबत असलेल्या नात्याला कबुली दिलेली नाही. अभिमन्यू ‘मर्द को दर्द नही होता’,‘निकम्मा’, ‘मिनाक्षी सुंदरेश्वर’, ‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमात काम केलं आहे. तर, श्रेया धन्वंतरीने ‘चुप’, ‘लूप लपेटा’ आणि ‘व्हाय चीट इंडिया’,‘स्कॅम १९९२’ यांमध्ये झळकली आहे.
 

Web Title: maine pyar kiya fame bhagyashree son abhimanyu dasani dating bollywood actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.