क्युट हेअरस्टाईल, तशीच स्माईल; महिमा चौधरीच्या लेकीला पाहिलंत का? व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 10:48 IST2025-11-14T10:48:25+5:302025-11-14T10:48:52+5:30
महिमाची लेक इतक्या कमी वयात प्रसिद्धीझोतात आली आहे.

क्युट हेअरस्टाईल, तशीच स्माईल; महिमा चौधरीच्या लेकीला पाहिलंत का? व्हिडीओ व्हायरल
'परदेस' फेम अभिनेत्री महिमा चौधरी पुन्हा हिंदी सिनेमांमध्ये झळकतआहे. गेल्या वर्षीच तिने बिग स्क्रीनवर कमबॅक केलं. कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' सिनेमात ती छोट्या भूमिकेत दिसली होती. काही दिवसांपूर्वी महिमा आणि अभिनेते संजय मिश्रा यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यात दोघं नवरा नवरीच्या भूमिकेत होते. त्यांचा नवा प्रोजेक्ट येत आहे त्यासाठी त्यांनी हा लूक केला होता. दरम्यान महिमाची लेकही सध्या प्रसिद्धीझोतात असते. लूक्समध्ये ती महिमासारखीच क्युट आणि सुंदर आहे. तुम्ही तिला पाहिलंत का?
अर्याना चौधरी असं महिमाच्या मुलीचं नाव आहे. अर्याना फक्त १८ वर्षांची आहे. इतक्या कमी वयातच तिने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आपल्या क्युट लूक, गोड स्माईलमुळे तिला लिटिल महिला असंच म्हटलं जात आहे. तर आता अरिनाचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात ती मैत्रिणीसोबत दिसत आहे. हा त्यांचा शाळेतला व्हिडीओ आहे. पंजाबी गाण्यावर दोघींनी रील केलं आहे. अर्यानाचा क्युटनेस, तिची हेअरस्टाईल पाहून चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे. 'स्कुल डेज' असं कॅप्शन तिने व्हिडीओला दिलं आहे.
'महिमाची मुलगी अगदी बाहुलीसारखीच दिसते','मिनी महिमा','परदेसच्या सीक्वेलमध्ये महिमाच्या मुलीला घ्या' अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. तर काही चाहत्यांनी अर्यानाची तुलना हॉलिवूड गायिका सेलेना गोमेजशी केली आहे.
दरम्यान महिमा चौधरी आगामी 'दुर्लभ प्रसाद ती दुसरी शादी' दिसणार आहे. सिनेमाची कास्ट पाहता गोष्ट नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे. महिमा आणि संजय मिश्रा ही जोडी पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. महिमा चौधरी २००६ साली बॉबी मुखर्जीसोबत लग्न केलं होतं. एका वर्षात २००७ साली महिमाने लेकीला जन्म दिला. तर लग्नानंतर ७ वर्षांनी महिमा आणि बॉबीचा घटस्फोट झाला.