रुटीन चेकअपसाठी गेली अन् बसला धक्का, अभिनेत्रीला झालेलं ब्रेस्ट कॅन्सरचं निदान; म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 14:49 IST2025-11-17T14:48:56+5:302025-11-17T14:49:51+5:30
अभिनेत्रीने त्या क्षणाची आठवण काढताना सांगितले...

रुटीन चेकअपसाठी गेली अन् बसला धक्का, अभिनेत्रीला झालेलं ब्रेस्ट कॅन्सरचं निदान; म्हणाली...
'परदेस'फेम अभिनेत्री महिमा चौधरीने काही काळापूर्वी ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज दिली. २०२२ पासून ती या विषयावर बोलत आहे. तिला ब्रेस्ट कॅन्सरचं आहे हे कधी आणि कसं कळालं याबद्दल नुकताच तिने खुलासा केला. रुग्णालयात केवळ रुटीन चेकअपसाठी गेली असता महिमाला धक्का बसला. तिच्या रिपोर्ट्समध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं. कोणतेही लक्षणं दिसत नसतानाही तिला हा गंभीर आजार झाला.
महिमा चौधरीने त्या क्षणाची आठवण काढताना सांगितले, "मला काहीच लक्षणं दिसत नव्हते. मी ब्रेस्ट कॅन्सरची तपासणीही केली नव्हती. कॅन्सर हा असा आजार आहे जो स्वत:हून पटकन कळत नाही. तपासणी केल्यानंतरच याचं निदान होतं. यामुळे जर तुम्ही दरवर्षी चेकअप केलं तर तुम्हाला वेळीच असं काही असेल तर समजेल आणि उपचारही लवकर सुरु होतील."
भारतातील उपचारावर ती पुढे म्हणाली, "३-४ वर्षांपूर्वी मला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झाल्यानंतर भारतात कॅन्सरवरील उपचारांबाबतीत मी अनेक बदल पाहिले. अनेक जेनेरिक औषधं स्वस्त मिळत आहेत. औषध कंपन्यांकडून पाठिंबा मिळतो. कॅन्सरविषयी जागरुकताही वाढली आहे. कॅन्सरशी झुंज देणाऱ्या अन्य व्यक्तींशी बोलल्यानंतर मलाही प्रेरणा मिळाली."
दरम्यान महिमा चौधरी आगामी 'दुर्लभ प्रसाद ती दुसरी शादी' दिसणार आहे. सिनेमाची कास्ट पाहता गोष्ट नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे. महिमा आणि संजय मिश्रा ही जोडी पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. महिमा चौधरी २००६ साली बॉबी मुखर्जीसोबत लग्न केलं होतं. एका वर्षात २००७ साली महिमाने लेकीला जन्म दिला. तर लग्नानंतर ७ वर्षांनी महिमा आणि बॉबीचा घटस्फोट झाला.