माही गिलने इतकी वर्षे मुलीला लपवले, आता समोर पहिला फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 10:48 IST2019-07-05T10:48:08+5:302019-07-05T10:48:52+5:30

देव डी, साहेब बीवी और गँगस्टर अशा चित्रपटांतून चाहत्यांचा मनाचा ठाव घेणारी अभिनेत्री माही गिल हिने नुकताच एक धक्कादायक खुलासा केला होता. मी अद्याप लग्न केलेले नाही. पण मला अडीच वर्षांची मुलगी आहे. मी रिलेशनशिपमध्ये आहे, असे तिने सांगितले होते.

Mahie Gill shares exclusive pictures with daughter Veronica, opens up about motherhood | माही गिलने इतकी वर्षे मुलीला लपवले, आता समोर पहिला फोटो!

माही गिलने इतकी वर्षे मुलीला लपवले, आता समोर पहिला फोटो!

ठळक मुद्देमाही गिले 2003 मध्ये अमितोज मानच्या ‘हवाएं’ मधून करिअरला सुरूवात केली होती.

देव डी, साहेब बीवी और गँगस्टर अशा चित्रपटांतून चाहत्यांचा मनाचा ठाव घेणारी अभिनेत्री माही गिल हिने नुकताच एक धक्कादायक खुलासा केला होता. मी अद्याप लग्न केलेले नाही. पण मला अडीच वर्षांची मुलगी आहे. मी रिलेशनशिपमध्ये आहे, असे तिने सांगितले होते. यावर्षी ऑगस्टमध्ये माझी मुलगी तीन वर्षांची होईल, असेही तिने सांगितले होते. या खुलाशानंतर माही गिलने पहिल्यांदा आपल्या मुलीचे फोटो शेअर केले आहेत. माहीच्या मुलीचे नाव वेरोनिका आहे. ही मुलगी माहीने दत्तक घेतलेली आहे की तिने तिला जन्म दिला आहे, याचा खुलासा मात्र माहीने केला नव्हता. माझी मुलगी माझ्यासोबत राहते. माझी आंटी तिची काळजी घेते. मीदेखील तिच्यासोबत अधिकाधिक राहण्याचा प्रयत्न करते. मला मीडियापासून माझे खासगी आयुष्य लपवायचे होते. त्यामुळे इतके वर्षे मी यावर काहीही बोलले नव्हते, असेही ती म्हणाली होती.

मी लिव्हइनमध्ये राहते
माहीने सांगितले होत की, मी अविवाहित आहे. पण माझा एक बॉयफ्रेन्ड आहे. आम्ही लवकरच लग्न करणार आहोत. परंतु लग्न करण्यामुळे किंवा न करण्यामुळे आम्हाला काहीही फरक पडत नाही. मला स्वातंत्र्य आणि स्पेस दोन्हीही हवे आहेत. आम्ही सध्या लिव्ह इनमध्ये राहतो. एकमेकांचा आदर करतो. एवढे आमच्या नात्यासाठी पुरेसे आहे. आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही लग्न करू, असे माहीने सांगितले होते.

माही गिले 2003 मध्ये अमितोज मानच्या ‘हवाएं’ मधून करिअरला सुरूवात केली होती. ‘खोया खोया चांद’मुळे प्रसिद्धी मिळवणा-या माहीला ‘साहेब बीवी और गँगस्टर’मुळे खरी ओळख मिळाली.
 

Web Title: Mahie Gill shares exclusive pictures with daughter Veronica, opens up about motherhood